मराठी बातम्या /बातम्या /देश /

पिंपरीच्या पाटलांनी पूर्ण केलं PM मोदींचं स्वप्न; गुजरात मिशन कसं उतरवलं सत्यात?

पिंपरीच्या पाटलांनी पूर्ण केलं PM मोदींचं स्वप्न; गुजरात मिशन कसं उतरवलं सत्यात?

गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे.

गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे.

गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पण, या विजयामागे एक मराठमोळा चेहरा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

अहमदाबाद, 8 डिसेंबर : भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक 156 जागा मिळाल्या आहेत. पक्ष अस्तित्वात आल्यानंतर गुजरातमधील भाजपचा हा सर्वात मोठा विजय आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची कल्पना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मांडली होती. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांच्या बैठकीत दीडशेहून अधिक जागा जिंकून विक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

पीएम मोदींची ही इच्छा सत्यात उतरवली ती सीआर पाटील यांनी. पाटील हे गुजरात भाजपचे अध्यक्ष आहेत. संपूर्ण निवडणुकीची जबाबदारीही पाटील यांच्यावर होती. त्यांनी हे कसं साध्य केलं? ते कोण आहेत आणि राजकारणात त्यांचा उदय कसा झाला? चला जाणून घेऊया.

कोण आहेत सीआर पाटील?

सीआर पाटील हे सध्या गुजरात भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 16 मार्च 1955 रोजी महाराष्ट्रातील पिंपरी येथे झाला. पाटील हे नवसारीचे खासदारही आहेत. पाटील यांचे कुटुंब गुजरातमध्ये वास्तव्यास होते, त्यामुळे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाले. पाटील यांनी सुरत आयटीआयमधूनही शिक्षण घेतले आहे. सीआर पाटील ही अशी व्यक्ती आहे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळची मानली जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन ते पक्षात नवनवीन प्रयोग करत राहतात. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सन 2015 मध्ये त्यांच्या कार्यालयाला चांगल्या व्यवस्थापन आणि देखरेखीसाठी ISO 2009 प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

सीआर पाटील यांचा राजकीय प्रवास 1989 पासून सुरू झाला. 2009 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर नवसारी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा तीच जागा मोठ्या फरकाने जिंकली. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते नवसारी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार झाले आणि सर्वाधिक मतांनी विजयी होणारे देशातील तिसरे खासदार ठरले. पाटील लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचे समन्वयकही होते. सीआर पाटील हे दक्षिण गुजरातमधील भाजपचा लोकप्रिय चेहरा आहेत.

वाचा - मोठ्या आत्मविश्वासाने केजरीवालांनी तीन नावं कागदावर लिहिली होती; त्या दाव्याचं काय झालं?

दीडशेहून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य कसे साध्य झाले?

या वर्षी जुलैमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातमधील दिग्गज नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत पीएम मोदींनी पक्षाला यावेळी राज्यात 150 हून अधिक जागा जिंकण्याचे टार्गेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सीआर पाटील यांच्याकडे होती. त्यांनी हे त्यांचे सर्वात मोठे ध्येय बनवले. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सीआर पाटील यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की, पीएम मोदींचे स्वप्न प्रत्येक स्तरावर पूर्ण होईल. पंतप्रधानपदाचे स्वप्न आता गुजरात भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे स्वप्न आहे.

सर्वसामान्यांशी थेट संबंध :

अध्यक्ष झाल्यानंतर सीआर पाटील यांनी पक्षाला थेट सर्वसामान्य जनतेशी जोडले. जनतेच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना स्वत: तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वत: प्रयत्न करा आणि प्रशासन-सरकारसमोर प्रश्न उपस्थित करा. त्यामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने लोकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

विरोधकांच्या फायरब्रँड नेत्यांवर जबाबदारी

2017 च्या निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये एक मोठे पाटीदार आरक्षण आंदोलन झाले. पाटीदार नेते हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर यांसारखे युवा नेते त्यात नेतृत्व करत होते. नंतर या तरुण नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील यांनी या नेत्यांना काँग्रेसपासून तोडले. दोन्ही युवा नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय 2017 मध्ये भाजपचा पराभव झालेल्या अनेक जागांच्या आमदारांचाही पक्षात समावेश करण्यात आला आहे.

वाचा - Gujarat Election Result: ठरलं तर! हे असणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपची घोषणा

कोरोनाच्या काळात प्रसिद्धी

कोरोनाच्या काळात सर्वजण अस्वस्थ होते. लोक हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी भटकत होते. अशावेळी सी.आर. पाटील एक प्रकारे वेगळे सरकार चालवू लागले. भाजप कार्यालयात पोहोचलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यात आली. सी.आर. पाटील यांनी आपला नंबरही जाहीर केला होता आणि ज्यांना कोणतीही अडचण येत असेल त्यांनी थेट माझ्याशी बोला, असे सांगितले होते. पाटील यांच्या या कार्यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

सीआर पाटील यांना नाविन्य कसे आणायचे हे माहित आहे. ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत अपडेट राहतात. जनतेला जोडण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबल्या जातात. त्यामुळेच आजही पाटील यांच्या सांगण्यावरून पक्षाकडून लाखो लोकांचे फोनवर मेसेज येतात. या निवडणुकीत प्रचारातही रोबोटचा वापर करण्यात आला. पाटील हे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात.

First published:

Tags: Gujrat Assembly Election, Pm modi