जाहिरात
मराठी बातम्या / देश / मोठ्या आत्मविश्वासाने केजरीवालांनी तीन नावं कागदावर लिहिली होती; त्या दाव्याचं काय झालं?

मोठ्या आत्मविश्वासाने केजरीवालांनी तीन नावं कागदावर लिहिली होती; त्या दाव्याचं काय झालं?

मोठा आत्मविश्वासाने केजरीवालांनी तीन नावं कागदावर लिहिली होती

मोठा आत्मविश्वासाने केजरीवालांनी तीन नावं कागदावर लिहिली होती

गुजरात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजयाचा दावा करणाऱ्या तीन नेत्यांची नावे कागदावर लिहून दिली होती. त्यांचं काय झालं?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अहमदाबाद, 8 डिसेंबर : गुजरात मध्ये भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे, तर काँग्रेस आपल्या आतापर्यंतच्या सर्वात वाईट पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. त्याचवेळी, गुजरातमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी पाच जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कागदावर लिहून आपल्या तीन नेत्यांच्या विजयाचा दावा केला होता, ज्यामध्ये आपचे मुख्यमंत्री चेहरा इसुदान गढवी आणि प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि अल्पेश कथिरिया यांची नावे होती. यापूर्वी पंजाब विधानसभा निवडणुकीतही त्यांनी असाच दावा केला होता. त्यावेळी त्यांचा दावा बरोबर ठरला अन् पंजाबमध्ये आपची सत्ता आली. गुजरातमध्ये त्यांचा दाव्याचं काय झालं? चला लगेच जाणून घेऊ. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत इसुदान गढवी, प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि अल्पेश कथिरिया यांच्या विजयाचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी एका कागदावर तिन्ही नेत्यांची नावे लिहून त्यांच्या जागांवर विजयाचा दावा केला होता. आम आदमी पक्षाचे हे तिन्ही नेते निवडणुकीत पराभूत होताना दिसत आहेत. खंभालिया : इसुदान गढवी मागे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा इसुदान गढवी हे देवभूमी द्वारकाच्या खंभलिया जागेवर निवडणूक लढवत होते, ज्यांच्या विजयाचा दावा सीएम केजरीवाल यांनी केला होता. या जागेवर भाजपचे उमेदवार मुलुभाई बेरा यांना 77305, आम आदमी पार्टीचे इसुदान गढवी यांना 58467 तर काँग्रेसचे विक्रम मॅडम यांना 44526 मते मिळाली आहेत. या जागेवर भाजपचा उमेदवार आम आदमी पार्टीच्या 18838 मतांनी पुढे आहे. वाचा - Gujarat Election Result: ठरलं तर! हे असणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपची घोषणा कटरगाम : गोपाल इटालिया पराभूत गुजरातमधील कटारगाम विधानसभा जागेसाठी आम आदमी पक्षाचे प्रदेश गोपाल इटालिया हे निवडणूक रिंगणात होते, त्यांच्या विजयाचा दावा अरविंद केजरीवाल यांनीही केला होता. या जागेवर भाजपचे विनू मोराडिया यांना 110515 तर गोपाल इटालिया यांना 49856 मते मिळाली. भाजपने ही जागा 60,659 मतांनी जिंकली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वराछा : अल्पेश कथिरिया मागे पटेल आरक्षण आंदोलनाचा प्रमुख चेहरा अल्पेश कथिरिया यांनी पाटीदारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वराछा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. अल्पेश कथिरिया निवडणूक जिंकतील असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता, मात्र निकाल उलटला आहे. भाजपचे उमेदवार किशोर कनानी यांना 66352, अल्पेश कथिरिया यांना 45358 तर काँग्रेसचे प्रफुल्ल तोगडिया यांना 43718 मते मिळाली. या जागेवर भाजपचा उमेदवार आम आदमी पक्षापेक्षा 20994 मतांनी पुढे आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीत मुख्यमंत्री केजरीवाल यांचा दावा फोल ठरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात