गांधीनगर, 8 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. 182 जागांपैकी 156 जागांवर भाजपला विजय मिळवला आहे. गुजरात राज्याच्या स्थापनेनंतरचा कोणत्याही पक्षाला मिळालेला हा सगळ्यात मोठा विजय आहे. याआधी 1980 साली काँग्रेसने माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वात 183 पैकी 149 जागा जिंकल्या होत्या. गुजरात विधानसभा निवडणुकीआधी मोरबीमध्ये ब्रिज कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये 130 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर विरोधकांनी तिथल्या भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. मोरबीच्या या मतदारसंघामध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. मोरबी मतदारसंघामध्ये भाजपच्या कांतीलाल अमृतिया यांचा विजय झाला. कांतीलाल अमृतिया यांना एकूण 1,14,538 मतं मिळाली. काँग्रेसचे जयंतीलाल पटेल 52,459 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तीनपैकी दोन विरोधक आपल्याच ताफ्यात घेतले, भाजपने फिरवलेली भाकरी ठरली गेम चेंजर!
#GujaratAssemblyPolls | BJP candidate from Morbi, Kantilal Amrutia leads with a total of 10,156 votes.
— ANI (@ANI) December 8, 2022
He reportedly saved several people's lives during the Morbi bridge collapse in October.
(File photo) pic.twitter.com/I1GyGVK2tW
अमृतियांनी वाचवले जीव मच्छु नदीवर असलेला ब्रिज ऑक्टोबर महिन्यात कोसळला होता, यात 130 पेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागला. या अपघातानंतर कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचा जीव वाचवला होता. सोशल मीडियावर अमृतिया यांचे बरेच व्हिडिओ समोर आले होते. या व्हिडिओमध्ये अमृतिया लाईफ जॅकेट घालून लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत होतं. या अपघातानंतर अमृतिया यांनी लगेच नदीमध्ये उडी मारली आणि लोकांची मदत केली, असं तिथल्या प्रत्यक्षदर्शींनीही सांगितलं होतं. यानंतर भाजपने मोरबीमध्ये अमृतिया यांना तिकीट दिलं. भाजपने दाखवलेला विश्वास अमृतिया यांनी सार्थ ठरवला. गुजरातमध्ये सातव्यांदा कमळ कसं फुललं? भाजपच्या विजयाची Inside Story 100-150 लोक उभं राहतील इतकी क्षमता मोरबीच्या पुलाची होती, पण त्या पुलावर पाच पट जास्त नागरिक उभे होते, ज्यामुळे हा अपघात झाला. गुजरात सरकारने अपघातातल्या पीडितांना मदतीची घोषणाही केली होती. ‘गॉडमदर’च्या मुलाचा ‘पॉवर’ गेम पवारांना पडला भारी; NCP ने तिकीट नाकारलं तरी…