जाहिरात
मराठी बातम्या / देश / एकाच वेळी21 हजार जोडपे अडकणार लग्नाच्या बेडीत, मंत्री महोदय करणार गिनीज रेकॅार्ड

एकाच वेळी21 हजार जोडपे अडकणार लग्नाच्या बेडीत, मंत्री महोदय करणार गिनीज रेकॅार्ड

एकाच वेळी21 हजार जोडपे अडकणार लग्नाच्या बेडीत, मंत्री महोदय करणार गिनीज रेकॅार्ड

विवाह सोहळ्यात कन्यादानासोबतच या मुलींचे गॉडफादर मंत्री गोपाल भार्गव यांचा 22 वर्षांचा संकल्पही पूर्ण होणार आहे.

  • -MIN READ Local18 Madhya Pradesh
  • Last Updated :

अनुज गौतम (सागर), 11 मार्च : बुंदेलखंडच्या राजकारणात कधीही हार न झालेला योद्धा म्हणून ओळखले जाणारे मंत्री गोपाल भार्गव यांनी 19 हजार 800 हून अधिक कन्यादान करण्याचा विश्वविक्रम केला आहे, ज्याची गिनीज बुकमध्ये नोंद आहे. दरम्यान त्यांच्याकडूनच आता पुन्हा पवित्र विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. त्यात 2100 वधू-वर एकाच मंडपाखाली सात फेरे घेणार आहेत. 101 पंडित विवाह विधी करणार आहेत. विवाह सोहळ्यात कन्यादानासोबतच या मुलींचे गॉडफादर मंत्री गोपाल भार्गव यांचा 22 वर्षांचा संकल्पही पूर्ण होणार आहे.

जाहिरात

2001 मध्ये मंत्री गोपाल भार्गव यांनी सागर जिल्ह्यातील गडकोटा येथे सामूहिक कन्यादान सुरू केले. तेव्हा त्यांनी आपल्या मतदारसंघातील धार्मिक पित्याची जबाबदारी पार पाडताना 21 हजार मुलींचे लग्न लावून देऊ, अशी शपथ घेतली होती. कोणत्याही गरीबाने मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेऊ नये, सावकाराच्या तावडीत अडकू नये. अशीही त्यांनी शपथ घेतली होती.

Shocking! भयंकर अपघातानंतर शेवटच्या घटका मोजत होतं जोडपं; इतक्यात सिंहांनी घेरलं अन्…

गडकोटा येथे कन्यादान विवाह सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यामध्ये होणाऱ्या विधींना सुरुवात झाली असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री गोपाल भार्गव यांची सून शिल्पी भार्गव यांनी नववधूंना आमंत्रित करून त्यांना हळद आणि मेंदी लावण्याचा विधी पार पाडला. यावेळी हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या वधू-वरांना मंत्री परिवाराकडून भेटवस्तू देण्यात आल्या. प्रत्येकाच्या हातावर मेंदी लावण्याबरोबरच गाण्याची संगीत मैफील रंगली होती.

जाहिरात

गरीब मुलींच्या लग्नात कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये हे लक्षात घेऊन मंत्री गोपाल भार्गव यांनी 2001 मध्ये चिरारी गावात पुण्यपूर्ण विवाह सोहळा सुरू केला होता. हा विवाहाचा 20 वा सोहळा आहे.

Video: डॉक्टरलाही हसू आवरेना! इंजेक्शन देताना असं ओरडलेलं मूल तुम्ही कधी पाहिलं नसेल

11 मार्च रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यात प्रत्येक टप्प्यात 2100 जोडपी एकत्र विवाह बंधनात अडकतील. मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत मिळणाऱ्या मदतीव्यतिरिक्त प्रत्येक जोडप्याला मंत्री गोपाल भार्गव यांच्याकडून अतिरिक्त भेटवस्तू देण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व नवविवाहित जोडप्यांची व त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात