नवी दिल्ली, 11 मार्च: बऱ्याच लोकांना लस म्हणजेच इंजेक्शनची खूप भीती वाटते. लसीकरणादरम्यान इंजेक्शन टोचताना फारसा त्रास होत नसला तरीसुद्धा अनेकजण ओरडून गोंधळ घालतात. इंजेक्शन करायचे आहे म्हटल्यानंतरच काहीजणांची गाळण उडते. अनेक ठिकाणी मुलं इंजेक्शन बघून पळून जातात. परंतु, काही झाले तरी प्रत्येकाला कधी ना कधी इंजेक्शन घ्यावेच लागते. इंजेक्शन टोचतानाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक मुलगा लस घेताना गोंधळ घालत आहे. इंजेक्शन घेण्याची भीती असलेले अनेक लोक तुम्ही पाहिले असतील, पण तुम्ही या मुलासारखा गोंधळ कोणी घातल्याचे पाहिले नसेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @AKookana नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिलंय की- काय हिम्मत आहे .. इंजेक्शन देण्याची .. तुम्ही हसणं थांबवू शकत नाही… मला वाटते की हा काश्मीरमधील मुलगा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलाला इंजेक्शन दिले जात आहे. आणि त्याच्या आईने त्याला मागून धरले आहे. पण, मुलाला इंजेक्शन लावताच तो मोठ्याने ओरडू लागतो. एवढेच नाही तर हा मुलगा रडतानाही विचित्र आवाज काढत आहे. त्याला पाहून तो रडत आहे की विनोद करत आहे, हे समजत नाही.
What a courage ..to inject injection .. can't stop your laughing 😂I thik it's Kashmir's child😂😂😂😂 pic.twitter.com/jUbAbmSNY5
— Aman kookana (@AKookana) September 15, 2021
लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि एकमेकांना खूप शेअर करत आहेत. व्हिडिओमध्ये मुलाचा आवाज ऐकून डॉक्टर हसणं थांबवू शकत नाहीत तेही मोठ-मोठ्यानं हसत आहेत. मुलाची आई सुद्धा त्याला पाहून खूप हसत असते. गंमत म्हणजे हा मुलगा रडत असताना डॉक्टरला रागाने काहीतरी बोलत आहे.