मराठी बातम्या /बातम्या /देश /

राहुल द्रविडच्या 'इंदिरानगर'मध्ये भीषण अपघात; आलिशान ऑडी कारही नाही वाचवू शकली 7 जणांचे प्राण

राहुल द्रविडच्या 'इंदिरानगर'मध्ये भीषण अपघात; आलिशान ऑडी कारही नाही वाचवू शकली 7 जणांचे प्राण

या अपघातात तीन तरुणींसह चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू (7 died) झाला आहे.

या अपघातात तीन तरुणींसह चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू (7 died) झाला आहे.

Road Accident in Indiranagar: काल रात्री दीडच्या सुमारास इंदिरानगर भागात एका ऑडी कारला भीषण अपघात (AudiQ Accident) झाला आहे. या अपघातात एका आमदाराचा मुलगा आणि त्यांच्या सुनेसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

इंदिरानगर, 31 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटर राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची एक जाहिरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं होती. ज्यामध्ये राहुल द्रविड एका ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यानंतर संताप अनावर होऊन, 'मैं इंदिरानगर का गुंडा हूँ' (Indiranagar ka goonda hu) असं म्हणताना दिसत होता. याच इंदिरानगर भागात काल रात्री एका आलिशान ऑडी कारला भीषण अपघात (Audi Car gruesome accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका आमदाराचा मुलगा आणि सुनेसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू (7 Died in Accident) झाला आहे. यातील सहा जणांनी घटनास्थळीच तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना अखेरचा श्वास घेतला आहे.

काल रात्री उशीरा तीन तरुणी आणि चार तरुण असे एकूण सात जण बेंगळुरू येथील इंदिरानगर परिसरातून सुसाट वेगानं कार चालवत जात होते. दरम्यान कारवरील नियंत्रण हटल्यानं आलिशान ऑडी कार इंदिरानगर परिसरातील कोरमंगला येथील एका विजेच्या खांबला जाऊन धडकली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ऑडी क्यू कारचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-आलिशान कारनं निष्पाप तरुणाला चिरडलं; बीडमधील बड्या नेत्याच्या पोराचं कृत्य

करुणा सागर आणि बिंदू असं अपघातात मृत पावलेल्या जोडप्याचं नाव आहे, दोघंही 23 वर्षांचे होते. यांच्यासोबतच केरळ येथील अक्षय गोयल, हरियाणा येथील उत्सव, हुबळी येथील रोहित, इशिता (21) आणि डॉ. डी जे अनुष (वय-21) असं मृत पावलेल्या सात जणांची नावं आहेत. भीषण अपघातातनंतर यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-पतीच्या भयंकर कृत्यानं औरंगाबाद हादरलं; पत्नीसमोरच चिरला स्वत:चा गळा, कारण समोर

संबंधित अपघातग्रस्त ऑडी कार तामिळनाडूच्या एका आमदाराची आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित कार होसूर येथील राजकीय नेताचा मुलगा करुणा सागरची होती. अपघातग्रस्त कारची अवस्था पाहून अपघात किती भयानक होता याचा अंदाज लावता येऊ शकतो. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. बोनट, कारचा आतील भाग आणि चाकं देखील तुटून पडले आहेत.

First published:

Tags: Bengaluru, Road accident