Home /News /maharashtra /

आलिशान कारनं निष्पाप तरुणाला चिरडलं; बीडमधील बड्या नेत्याच्या पोराचं कृत्य

आलिशान कारनं निष्पाप तरुणाला चिरडलं; बीडमधील बड्या नेत्याच्या पोराचं कृत्य

दुचाकीला धडक देणारी अलिशान कार ही परळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलाची असल्याची चर्चा आहे. (फोटो-साम टीव्ही)

दुचाकीला धडक देणारी अलिशान कार ही परळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलाची असल्याची चर्चा आहे. (फोटो-साम टीव्ही)

Accident in Beed: बीड जिल्ह्याच्या परळी (Parali) तालुक्यात एका मद्यधुंद तरुणानं आपल्या आलिशान कारनं रस्त्यावरून (luxury car hit bike) जाणाऱ्या एका निष्पाप तरुणाचा बळी (Young man death) घेतल्याची घटना समोर आली आहे.

    परळी, 30 ऑगस्ट: बीड (Beed) जिल्ह्याच्या परळी (Parali) तालुक्यात एका मद्यधुंद तरुणानं आपल्या आलिशान कारनं रस्त्यावरून (luxury car hit bike) जाणाऱ्या एका निष्पाप तरुणाचा बळी (Young man death) घेतल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं सुसाट वेगानं कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाला जोरदार धडक दिली आहे. या दुर्दैवी अपघातात संबंधित दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू (death in road accident) झाला आहे. दुचाकीला धडक देणारी अलिशान कार ही परळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलाची असल्याची चर्चा आहे. संबंधित अपघात परळी शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या तळेगाव परिसरात घडली आहे. दरम्यान प्रमोद भगवान तांदळे हा तरुण आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी किंगमेकर नाव लिहिलेली आलिशान कारनं सुसाट वेगात येत प्रमोदच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे प्रमोद दुचाकीसोबत बराच अंतर दूर फेकला गेला. या घटनेत प्रमोदचा जागीच मृत्यू झाला आहे. हेही वाचा-दोघांकडून निराधार महिलेसोबत अमानुष कृत्य; अंधाराचा फायदा घेत घरात शिरले अन्... या घटनेची माहिती संपूर्ण शहरात वाऱ्याच्या वेगानं पसरली आहे. यानंतर मृत तरुण प्रमोद तांदळे यांच्या नातेवाईकांनी परळी ग्रामीण पोलीस ठाणे परिसरात ठिय्या आंदोलन केलं आहे. आंदोलन कर्त्यांनी संबंधित कारचालकावर तात्काळ कारवाई करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. परळी पोलीस संबंधित बड्या राजकीय नेत्याच्या मुलावर गुन्हा दाखल करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हेही वाचा-अश्लील कमेंटबाबत जाब विचारल्यानं महिला पोलिसावर हल्ला; रॉडनं वार करत फोडलं डोकं वाढदिवसाला आलिशान कार भेट देत लेकाचा पुरवला हट्ट साम टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, परळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षानं काही दिवसांपूर्वी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला ही आलिशान कार भेट म्हणून दिली होती. आपल्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले होती. पण मुलानं तीच कार दारू पिऊन चालवत एका निष्पाप युवकाचा जीव घेतला आहे. या घटनेनंतर नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news, Death, Road accident

    पुढील बातम्या