मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

पतीच्या भयंकर कृत्यानं औरंगाबाद हादरलं; पत्नीसमोरच चिरला स्वत:चा गळा, समोर आलं कारण

पतीच्या भयंकर कृत्यानं औरंगाबाद हादरलं; पत्नीसमोरच चिरला स्वत:चा गळा, समोर आलं कारण

काल रात्री मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एका तरुणानं आपल्या पत्नीसमोरच धारदार शस्त्रानं स्वत:चा गळा चिरला आहे.

काल रात्री मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एका तरुणानं आपल्या पत्नीसमोरच धारदार शस्त्रानं स्वत:चा गळा चिरला आहे.

Suicide Case Aurangabad: सोमवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडलेल्या एका घटनेनं औरंगाबाद हादरलं आहे. काल रात्री मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एका तरुणानं आपल्या पत्नीसमोरच धारदार शस्त्रानं स्वत:चा गळा चिरला (husband slit his own throat) आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

औरंगाबाद, 31 ऑगस्ट: सोमवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडलेल्या एका घटनेनं औरंगाबाद (Aurangabad) हादरलं आहे. काल रात्री मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एका तरुणानं आपल्या पत्नीसमोरच धारदार शस्त्रानं स्वत:चा गळा चिरला (husband slit his own throat) आहे.    या भयंकर घटनेनंतर आसपासच्या लोकांनी संबंधित जखमी तरुणाला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात संबंधित तरुणावर उपचार सुरू आहे. ही घटना समोर आल्यानंतर बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भाऊसाहेब तुळशीराम काकडे असं स्वत: चा गळा चिरून घेणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी आहे. त्यानं सोमवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर ही भयंकर कृत्य केलं आहे. संबंधित तरुणानं बायकोसोबत झालेल्या वादानंतर हे टोकाचं पाऊल उचचल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-द्रविडच्या 'इंदिरानगर'मध्ये भीषण अपघात; ऑडी कारही नाही वाचवू शकली 7 जणांचे प्राण

नेमकं काय घडलं?

33 वर्षीय जखमी भाऊसाहेब काकडे याचं काही दिवसांपूर्वी राणी काकडे नावाच्या 23 वर्षीय युवतीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर पहिले सहा महिने दोघांत सर्वकाही अलबेल सुरू होतं. पण त्यानंतर काकडे दाम्पत्यांत छोट्या छोट्या कारणांतून वाद व्हायला सुरुवात झाली. कालांतरानं त्यांच्यातील वाद वाढतच गेले. एकमेंकासोबत सततच्या होणाऱ्या वादाला कंटाळून संबंधित दाम्पत्यानं सोमवारी घटनेच्या दिवशी बाँडवर घटस्फोट घेतला.

हेही वाचा-डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीने आखला दुसरीच्या हत्येचा कट; मास्कमुळे तिसरीची हत्या

बाँडवर घटस्फोट घेतल्यानंतर दोघंही सोबत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. याठिकाणी दोघांत पुन्हा वादाला सुरुवात झाली. यावेळी राग अनावर झाल्यानं भाऊसाहेब यानं धारदार शस्त्रानं स्वत: चा गळा चिरून घेतला आहे. या घटनेत भाऊसाहेब हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Crime news, Suicide