बिग बाॅसच्या घरात 'हुकुमशहा' नंदकिशोर असा का वागला ?

नंदकिशोर जेव्हा घरात आला तेव्हा उषा नाडकर्णी यांची मस्करी करत असताना शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर नंदकिशोर हा पुष्कर, सई, मेघा धाडे आणि शर्मिष्ठा या गटाच्या टार्गेटवर आला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2018 09:07 PM IST

बिग बाॅसच्या घरात 'हुकुमशहा' नंदकिशोर असा का वागला ?

मुंबई, 20 जून : मराठी बिग बॉस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. काल मंगळवारी प्रक्षेपित झालेल्या भागात हुकुमशहा झालेल्या नंदकिशोर चौगुलेमुळे मोठा वादंग निर्माण झालाय.

मराठी बिग बाॅसच्या घरात आधी रेशम टिपणीस आणि राजेश श्रृंगारपुरेच्या जवळीकमुळे एकच कल्लोळ उडाला होता. आता नंदकिशोर चौगुलेमुळे मराठी बिग बाॅस चर्चेचा विषय ठरलाय.

 

नेहमीप्रमाणे बिग बाॅसच्या घरात साप्ताहिक कार्यानुसार काल हुकुमशहा असा टास्क देण्यात आलाय. या टास्कमध्ये नंदकिशोर चौगुले हा हुकुमशहा साकारत आहे आणि घरातील सदस्य हे त्याची प्रजा आहेत. घरात तुम्हाला जेवणे करणे असो अथवा बाथरूमला जायचे असेल तरी तुम्हाला हुकुमशहाची परवानगी घ्यावी लागेल अशी अट या टास्कमध्ये देण्यात आली. नंदकिशोरने रक्षक म्हणून आस्तादची निवड केली. आणि सेविका म्हणून स्मिताची निवड केली. सुरुवातील हुकुमशहाच्या जयघोष आणि नृत्य करण्याचा आदेश नंदकिशोरने दिला.

काय घडले घरात ?

Loading...

नंदकिशोर यांनी हुकुमशहा होताच सई, मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत आणि पुष्करला कामाला लावले. हीच कामं वादात सापडली आहे. नंदकिशोरने पुष्करला बुट साफ करणे आणि पाय धुऊन काढणे अशी आज्ञाच केली. पुष्करने अक्षरश: आपल्या शर्टाने त्याच्या बुटाची पाॅलिश केली.

त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना धुण्याचे कपडे आणण्यास सांगितली हे सर्व कपडे मेघाला धुण्यास सांगितलं. एवढंच नाहीतर वाळलेले कपडे हे मेघाला हातावर ठेवून वाळवायला सांगितलं.

त्यानंतर आपला मोर्चा शर्मिष्ठाकडे वळवला. शर्मिष्ठाला आपली मसाज करण्याची आज्ञाच नंदकिशोर दिली तेव्हा शर्मिष्ठाने आपण घातलेल्या कपड्यामुळे अडचण होत आहे तरी जॅकेट घालू द्यावी अशी विनंती केली. पण नंदकिशोरने ती फेटाळून लावली. शर्मिष्ठाने घरी आपण मोठ्या भावाची मसाज करत असतो त्याच्या जागी तुम्हाला ठेवून कार्य करते असं सांगितलं आणि नंदकिशोरची सेवा करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर नंदकिशोरने सई लोकुरला मनोरंजन करण्यासाठी  नृत्य करण्याचा आदेश दिला. हुकुमशहाच्या खोलीत सईने नृत्य करून हुकुमशहाचं मनोरंजन केलं. महिलांसोबत अशा या वर्तवणुकीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

नंदकिशोर असा का वागला ?

बिग बाॅसच्या घरात नंदकिशोर आणि शर्मिष्ठा हे दोघेही वाईल्ड कार्ड एंट्री आहे. दर आठवड्यात घरात नाॅमिनेट करण्याची प्रक्रिया पार पडत असते. नंदकिशोर जेव्हा घरात आला तेव्हा उषा नाडकर्णी यांची मस्करी करत असताना शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर नंदकिशोर हा पुष्कर, सई, मेघा धाडे आणि शर्मिष्ठा या गटाच्या टार्गेटवर आला. दुसऱ्याच दिवशी किचन रुमध्ये नंदकिशोर आणि पुष्करमध्ये हमरीतुमरीवर आली होती. त्याच वेळी सई, मेघा आणि शर्मिष्ठा नंदकिशोरसोबत घमासान शाब्दिक युद्धच झाले. या वादामुळे सुत्रसंचालक महेश मांजेरकर यांनी नंदकिशोरला खडेबोल सुनावले होते. नंदकिशोर यांनी त्यानंतर जाहीर माफी मागितली होती.

हा प्रकार झाल्यानंतर सई आणि मेघाच्या टीमने नंदकिशोरला वारंवार टार्गेट केलं. नंदकिशोर हा या घरात राहण्यास अपात्र असल्याचा ठपकाच सई आणि पुष्करने वारंवार सांगितलं.

नाॅमिनेशनचा बदला?

या आठवड्यात सईने पुन्हा एकदा नंदकिशोरला घराबाहेर पडण्याचा प्रक्रियेसाठी नाॅमिनेट केलं. त्यामुळे नंदकिशोर कमालाची नाराज झाला होता. त्याने काल आपली नाराजी बिग बाॅसच्या कॅमेऱ्यात बोलून दाखवली. मेघाने सात लाख खर्च करून कपड्यांची खरेदी केली. तर पुष्कर हा एक माठ अभिनेता आहे जो काहीच करत नाही फक्त युकेबद्दल बडबड करतो.

तर सईही लाडावलेली मुलगी असून तिला कुणी आपल्या घरात अर्धा तासही ठेवणार नाही अशीही लोक बिग बाॅसच्या घरात अपात्र आहे असं नंदकिशोरने सांगितलं. नाॅमिनेट केल्यामुळे हुकुमशहाच्या टास्कमध्ये नंदकिशोरच्या हातात आयती संधी चालून आली त्याने याचा पुरेपूर फायदा घेत सई आणि मेघाच्या टीमवर आसूडच ओढला.

महेश मांजरेकरही नाराज

कालचा हुकुमशहाचा टास्क पाहून महेश मांजरेकरांनी नाराजी व्यक्त केली. कालच शो संपल्यानंतर ठिक अकरा वाजता महेश मांजरेकर यांनी एक टि्वट केलं. या टि्वटमध्ये

आज मला लाज वाटते, असं त्यांनी म्हटलंय.

बाल विकास विभागाचा इशारा

बिग बाॅसमध्ये महिलांची निंदा केली जात असेल अथवा प्रतिमा वाईट केली जात असेल तर महिला बाल विकास विभाग यात लक्ष देईल असा इशारा महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दिला.

मेघाला बुटावर नाक घासयला लावणार

दरम्यान, आज बिग बाॅसच्या घरात हुकुमशहा टास्कचा दुसरा भाग होणार आहे. आजही हुकुमशहाने सर्वांना आयुष्यात न केलेल्या गोष्टी विचारल्या असता पुष्करने कोणतीही शिक्षा भोगली नाही अशी इच्छा व्यक्त केली. तर नंदकिशोरने पुष्करला कोलूला जुंपले. एवढंच नाहीतर मेघाला बुटावर नाक घासायला लावलं असं प्रोमोतून दिसतंय. त्यामुळे आजच्या भागात काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 09:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...