मल्लापुरम, 15 मे : अंडं (Egg) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बाहेरून पांढरा भाग आणि त्याच्या आत पिवळा बलक (yellow yolk) असंच चित्र येतं. आतापर्यंत अशीच अंडी आपण सर्व खात आलोत. मात्र तुम्ही कधी हिरवं अंडं (green egg) खाल्लं आहे का? किमान पाहिलं तरी आहे का? पाहणंही दूर तुम्हीही अशी कल्पनाही करणार नाही. कोंबडीनं हिरव्या बलकाची अंडी दिली असं तुम्हाला सांगितलं तरी ते खोटंच वाटेल. हे कसं काय शक्य आहे? असं तुम्ही विचारल.
मात्र केरळमधल्या (kerala) कोंबड्यांनी अशा अंडी दिलीत जी बाहेरून पांढरी आणि आतून हिरवी आहेत, म्हणजे अंड्यातील बलक हा पिवळा नसून तो हिरवा (green yolk) आहे.
हे वाचा - या हॉटेलमध्ये पुतळ्यांनी बुक केल्या खुर्च्या; निम्म्या खुर्च्यांवरच माणसं बसणार
ही घटना आहे, मल्लापुरममधील कोट्टाकलातील. इथल्या शहाबुद्दीन पोल्ट्री फार्ममध्ये ही कोंबडी आहेत. 9 महिन्यांपूर्वी इथल्या एका कोंबडीनं असं अंड सर्वात आधी दिलं. त्यानंतर पोल्ट्री फार्म मालकानं त्यातून पिल्लू येण्याची प्रतीक्षा केली, जेणेकरून काही वेगळंपण असेल तर समजेल. मात्र त्यामध्ये त्यांना काहीचं वेगळं असं दिसलं नाही. आता या पोल्ट्री फार्ममध्ये एक-दोन नव्हे तर सात कोंबड्या आहेत. ज्या अशी वेगळी अंडी देतात.
हे वाचा - अरे देवा! कुत्रा समजून घरी घेऊन आला कोल्ह्याचं पिल्लू, PHOTO VIRAL
ही कोंबडी इतर कोंबड्याप्रमाणेच आहेत. फक्त त्या आकारानं थोड्या लहान आहेत, बाकी त्यांच्यामध्ये काही वेगळं नाही. या कोंबड्यांनी दिलेल्या अंड्याच्या बलकाचा रंग अजिबात बदलत नाही. हे अंड कच्च असो किंवा शिजलेलं त्यातील बलकाचा रंग हिरवाच राहतो. या अंड्यांबाबत माहिती मिळताच शहाबुद्दीन यांच्या घराबाहेर ही अंडी खरेदी करण्यासाठी लोकांची लाईन लागली आहे.
शहाबुद्दीन यांच्या मते, कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यामुळे असं होत असावं. त्यांच्या फार्ममध्ये अनेक प्रजातीची कोंबडी आहेत. क्रॉस ब्रीडिंगमुळे असं होऊ शकतं. मात्र याबाबत अभ्यास व्हावा असं, तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड