वॉशिंग्टन, 15 मे : लॉकडाऊन (lockdown) संपल्यानंतर तुम्ही या हॉटेलमध्ये (hotel) गेलात आणि तुम्हाला शेजारील सीटवर तुमच्या सोबत असलेली व्यक्ती हवी असे, तर तुम्हाला आता तसं करता येणार नाही. कारण आधीपासूनच या सीट्सवर कुणीतरी बसलेलं असणार आहे. बरं तुम्ही त्याला किंवा तिला दुसरीकडे बसण्याची विनंती केली तरी तो किंवा ती स्वत:ची खुर्ची सोडणार नाही. तुमचं काहीही ऐकणार नाही आणि तुमच्याशी काहीही बोलणार नाही. कारण तुमच्या शेजारी असलेल्या या खुर्चीवर कोणता माणूस नाही तर पुतळा (mannequins) बसलेला आहे.
अमेरिकेच्या (america) व्हर्जिनियातील (virgina) इन अ लिटल वॉशिंग्टन (Inn at Little Washington) या रेस्टॉरंटमधील हे चित्र आहे. कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीत हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्सिंग (social distancing) कसं ठेवता येईल, यासाठी हॉटेलनं ही अनोखी योजना तयार केली आहे.
हे वाचा - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर घेतला निर्णय, चीनच्या शेअर मार्केटमध्ये भूकंप
द गार्डियनच्या रिपोर्टनुसार लॉकडाऊननंतर हॉटेल सुरू झाल्यावर सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवावं यासाठी इन अ लिटल वॉशिंग्टन तयारी सुरू केली आहे. या हॉटेलमध्ये आता जास्त गर्दी नसणार. हॉटेलमध्ये फक्त 50 टक्केच लोकं येऊ शकतात. मात्र या 50 टक्के ग्राहकांच्या सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी या पुतळ्यांवर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शेजारच्या खुर्चीवर हा पुतळा बसलेला असेल. जेणेकरून त्याच्या शेजारी दुसरी व्यक्ती बसणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवलं जाईल. शिवाय खाताना एकटेपणा वाटू नये, यासाठी हे पुतळे त्यांना कंपनी देणार आहेत. या पुतळ्यांनाही सर्व काही सर्व्ह केलं जाईल.
हे वाचा - कोरोनाच्या संकटकाळात या कंपनीचा मोठा निर्णय, वाढवणार कर्मचाऱ्यांचा पगार
कोरोनाव्हायरसविरोधात जोपर्यंत प्रभावी लस मिळत नाही, तोपर्यंत समाजात वावरताना सोशल डिस्टन्सिंग हा एक मार्ग आहे आणि व्हर्जिनियातील या हॉटेलनं सोशल डिस्टन्सिंगसाठी एक अनोखा मार्ग शोधला आहे.
जगातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण अमेरिकेत आहेत. 1,457,649 एकूण प्रकरणांची नोंद आहे, तर 86,912 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाव्हायरसचे 4,545,185 रुग्ण आहेत, 303,855 रुग्णांचा व्हायरसने बळी घेतला आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड