नवी दिल्ली 11 मे: संपायला येत असलेलं लॉकडाऊन आणि वाढत असलेली रुग्णांची संख्या यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढ असल्याने केंद्राचे टास्क फोर्स आता नवी योजना तयार करत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशातल्या सर्व राज्यांना पुन्हा गाईड लाईन्स पाठविण्यात येणार आहेत. केल्या 24 तासांमध्ये COVID-19चे देशात 4,213 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 97 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे देशात रुग्णांची एकून संख्या ही 67,152 एवढी झाली आहे.
तर मृत्यूचा आकडा 2,206वर गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 1,559 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत रुग्ण बरे होण्याची ही सर्वात मोठी संख्या आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 31.15 असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
अजुनही देशात कम्युनिटी स्रेड झालं असं म्हणता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागावर आता जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून कोरोनाला रोखण्यासाठी आणखी काही उपयांवर तज्ज्ञ काम करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आरोग्य सेतू App हा पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
‘बाबा मला नाही जायचं’..4 वर्षांची कोरोनाग्रस्त चिमुरडी ओक्साबोक्शी लागली रडू
आत्तापर्यंत या Appच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी 4 लाख लोकांना अलर्ट पाठविण्यात आले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) संपायला अजून सहा दिवस असले, तरी रेल्वेने (Indian Railway) काल महत्त्वपूर्ण घोषणा करत काही मार्गांवरच्या प्रवासी गाड्या सुरू करत असल्याचं सांगितलं. मंगळवारपासून या 15 मार्गांवर दोन्ही बाजूकडून सेवा सुरू होतील. त्यात महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रमुख दोन ट्रेन आहेत. irctc.co.in या indian railway च्या website वर त्यासाठी बुकिंग करावं लागेल.
लक्षणं नाहीत तरी 7 टेस्ट पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांच्या डिस्चार्ज नियमांवर प्रश्न
51 दिवसांच्या ब्रेकनंतर रेल्वेने सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या ट्रेनचं तिकीट फक्त ऑनलाईनच काढता येणार आहे. रेल्वे स्टेशनवर कुठल्याही ट्रेनचं तिकीट मिळणार नाही. RAC, Waiting अशी कुठलीही यादी या ट्रेनला नसेल. फक्त कन्फर्म तिकीट मिळालं असेल त्यांनाच प्रवासाची अनुमती देण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus