• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, म्हणून...'; मंत्र्याच्या VIDEO मुळे राजकीय वर्तुळात खळबळ

'विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, म्हणून...'; मंत्र्याच्या VIDEO मुळे राजकीय वर्तुळात खळबळ

जर सर्वच जणं मुख्यमंत्र्यांच्या जातीचे असते तर...

 • Share this:
  भोपाळ, 28 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिवराज सरकारमधील (Shivraj Government) मंत्री कुंवर विजय शाह यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. या व्हिडीओमध्ये मंत्री कुंवर विजय शाह एका मुलीकडे लक्ष ठेवण्याबद्दल एका महिला अधिकारीला सांगत आहे. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मंत्री कुंवर विजय शाह महिला अधिकारीला म्हणत आहे की, ही मुलगी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, त्यामुळे हिच्याकडे लक्ष द्या. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या या व्हिडीओवर काँग्रेसकडून टीका केली जात आहे. गेल्या गुरुवारी मध्य प्रदेशचे वन मंत्री कुंवर विजय शाह (Madhya Pradesh Forest Minister Kunwar Vijay Shah) नरसिंपूरच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान एके ठिकाणी मंत्री नागरिकांच्या समस्या ऐकत होते. त्यावेळी एक विद्यार्थिनी स्वत:ची अडचण घेऊन त्यांच्या जवळ आली. यादरम्यान मंत्री विजय शाह यांनी उपस्थित महिला अधिकारीला तिची समस्या नोंदवून घ्यायला सांगितलं. हे ही वाचा-भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या महिला सरन्यायाधीश होणार समस्या सांगण्यापूर्वी मंत्रीने विद्यार्थिनीला नाव विचारलं. ज्यानंतर विद्यार्थिनीने आपलं नाव शिवानी किरार असल्याचं सांगितलं. जसं विद्यार्थिनीने आपलं नाव सांगितलं त्यानंतर मंत्र्यानी विद्यार्थिनीच्या नावाचा उल्लेख करीत ती मुख्यमंत्र्यांच्या जातीचं असल्याचं महिला अधिकारीला सांगितलं. म्हणून हिची काळजी घ्या. मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर तिथं उपस्थित असलेले अनेक अधिकारी हसू लागले. ज्यानंतर मंत्री देखील आपलं हसू रोखू शकले नाही. या दरम्यान तेथे उभे असलेल्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: