Goa Municipal Election 2021 Result : गोवा नगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी

गोवा नगर पालिका (municipal corporation), 6 नगरपालिका, 17 ग्रामपंचायती, नावेली जिल्हा पंचायत, नगर परिषद निवडणुकीची (Municipalities) मतमोजणी होत आहे. पणजी महापालिका आणि 6 नगरपालिकेची मतमोजणी पूर्ण झाली असून भाजपने बाजी मारली आहे. उर्वरीत ग्रामपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीचा निकाल अद्याप बाकी असून निकालाकडे सर्वांचं लक्ष्य लागले आहे.

 • News18 Lokmat
 • | March 22, 2021, 18:13 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  16:38 (IST)

  गोवा नगरपरिषद निवडणूक अपडेट - दक्षिण गोव्यातील कुंकळी नगरपालिकेमध्ये काँग्रेसनं काँग्रेस पुरस्कृत नऊ उमेदवार निवडून आले असून भाजपला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे.

  16:37 (IST)

  गोवा नगरपरिषद निवडणूक अपडेट - पेडणे नगरपालिकेमध्ये सहा जागा भाजप पुरस्कृत अपक्ष जिंकले असून 4 जागा काँग्रेस पुरस्कृत अपक्षांनी जिंकल्या आहेत.

  16:37 (IST)

  गोवा नगरपरिषद निवडणूक अपडेट - डिचोली नगरपालिकेमध्ये 14 जागांसाठी निवडणूक झाली होती यापैकी भाजप पुरस्कृत 9 उमेदवार निवडून आले आहेत तर अन्य उमेदवारांना काँग्रेस आणि मगोचा पाठिंबा होता असे 5 उमेदवार विजय झाले आहेत.

  16:37 (IST)

  गोवा नगरपरिषद निवडणूक अपडेट - काणकोण नगरपालिकेच्या सर्व 12 जागा भाजपने जिंकले आहेत

  16:36 (IST)

    गोवा नगरपरिषद निवडणूक अपडेट - कुडचडे नगरपालिकेमध्ये 8 जागा भाजप पुरस्कृत आमदार उमेदवारांनी जिंकली आहेत तर 7 जागा काँग्रेस पुरस्कृत अपक्षानी जिंकल्या आहेत

  16:35 (IST)

    गोवा नगरपरिषद निवडणूक अपडेट - 10 सदस्य असणाऱ्या वाळपई नगरपालिकेमध्ये भाजप पुरस्कृत 9 उमेदवार निवडून आले असून केवळ 1 जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.

  16:35 (IST)

  गोव्यातल्या पणजी महानगरपालिकेसह अन्य सहा नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. पणजी महानगरपालिकेमध्ये भाजपला भरघोस यश मिळवले असून 30 पैकी 25 जागा भाजप गटाने जिंकल्या आहेत तर अन्य 5 जागा काँग्रेस पुरस्कृत अपक्षांना मिळाले आहेत.

  16:34 (IST)

   गोव्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपाला यश, 1 पालिका काँग्रेसकडे

  10:6 (IST)

  गोव्यात पणजी महानगरपालिकेच्या 30 पैकी 25 जागांवर भाजप पुरस्कृत प्रोग्रेस फॉर टूगेदर या पॅनेलचे उमेदवार विजयी झाल्याने पणजी महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसचे पुरस्कृत केवळ 5 जण निवडून आले.

  10:5 (IST)

  पणजी पालिका निवडणूक निकाल अपडेट-  विठ्ठल चोपडेकर वार्ड क्रमांक 28 मधून विजयी

  गोवा नगर पालिका (municipal corporation),  6 नगरपालिका, 17 ग्रामपंचायती, नावेली जिल्हा पंचायत, नगर परिषद निवडणुकीची  (Municipalities)  मतमोजणी होत आहे. पणजी महापालिका आणि 6 नगरपालिकेची मतमोजणी पूर्ण झाली असून भाजपने बाजी मारली आहे. उर्वरीत ग्रामपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीचा निकाल अद्याप बाकी असून निकालाकडे सर्वांचं लक्ष्य लागले आहे.