जाहिरात
मराठी बातम्या / देश / Goa Municipal Election 2021 : गोवा महापालिकेसह ग्रामपंचायतीचा आज फैसला, कोण मारणार बाजी?

Goa Municipal Election 2021 : गोवा महापालिकेसह ग्रामपंचायतीचा आज फैसला, कोण मारणार बाजी?

Goa Municipal Election 2021 : गोवा महापालिकेसह ग्रामपंचायतीचा आज फैसला, कोण मारणार बाजी?

या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष राजधानी पणजीच्या महानगरपालिकेकडे लागेलं असून इथं 30 जागांसाठी मतमोजणी होत

  • -MIN READ
  • Last Updated :

अनिल पाटील, प्रतिनिधी गोवा, 24 मार्च : गोव्यात राजधानी पणजी महानगरपालिकेसह (Municipal Corporation), 17 ग्रामपंचायती, नावेली जिल्हा पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीची  (Municipalities) आज मतमोजणी होणार आहे. तसंच 6 नगरपालिकेसाठी मतमोजणी केली जाणार आहे. एकूण 423 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला आज होणार आहे. त्यामुळे संपूर्ण गोव्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. कोरोनामुळे लांबलेल्या स्थानिक निवडणूक अखेर पार पडत आहे. गोव्यात महापालिका, 6 ग्रामपंचायती, नावेली जिल्हा पंचायत आणि सांखळी पालिकेच्या एका प्रभागासाठी मतमोजणी होणार आहे. चित्रपट निर्मात्यानं केली होती विचित्र मागणी; प्रियांका चोप्रानं केला खुलासा गोव्यात राजधानी पणजी महानगरपालिकेसह 6 नगरपालिकांचे आज मतमोजणी होत आहे. यात डिचोली, पेडणे, वाळपई, कुडचडे, कानकोन आणि कुंकळी या नगरपालिकांचा समावेश आहे. याबरोबरच नावेली जिल्हा पंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून ग्रामपंचायतींच्या अठरा जागांसाठी पोट निवडणूकींची मतमोजणी आज होत आहे. साडेआठ वाजता मतमोजणी ला सुरुवात होत असून 11 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. तसंच, पणजी महानगरपालिका आणि सहा नगरपालिकांच्या 421 जागांसाठी ही मतमोजणी होत आहे. एकूण 423 उमेदवारांच्या भविष्याचा आज फैसला होणार आहे. या निवडणुका पक्षीय पातळीवर न झाल्याने स्थानिक पॅनल आणि अपक्ष उमेदवारांचा भरणा या निवडणुकीत जास्त आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा हे निवडून आलेल्या उमेदवारांच्या अंतिम निर्णय नंतरच ठरेल, मात्र सध्यातरी गोव्यात सत्तेवर असलेला भाजप आणि विरोधी काँग्रेस आणि इतर पक्षांनी अनेक उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष राजधानी पणजीच्या महानगरपालिकेकडे लागेलं असून इथं 30 जागांसाठी मतमोजणी होत असून भाजप पुरस्कृत टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह आणि आम्ही पणजीकर या पॅनल मध्ये मुख्य चुरस आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात