चित्रपट निर्मात्यानं केली होती विचित्र मागणी; प्रियांका चोप्रानं केला गंभीर खुलासा

चित्रपट निर्मात्यानं केली होती विचित्र मागणी; प्रियांका चोप्रानं केला गंभीर खुलासा

प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) अलीकडेच प्रसिद्ध अभिनेत्री ओपरा विन्फ्रे (Oprah Winfrey) यांच्या 'सुपर सोल' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामध्ये तिने चित्रपट निर्मात्यानं (Film maker) केलल्या अश्लील वर्तनाचा खुलासा देखील केला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मार्च: गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka chopra) सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. अलीकडेच तिने 'माझे वडिल मशिदीमध्ये गायचे' असं वक्तव्य केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलचं ट्रोल केलं होतं. असं असताना आता आणखी एक गंभीर खुलासा समोर आला आहे. अलीकडेच प्रियांका चोप्राने प्रसिद्ध अभिनेत्री ओपरा विन्फ्रेच्या (Oprah Winfrey) 'सुपर सोल' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ओपरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra interview) अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने आपल्या बालपणाबाबत, तिच्या नवीन पुस्तकाबाबत तसेच तिच्या लग्नाबाबतही विविध खुलासे केले आहेत.

याच कार्यक्रमात प्रियांकाने बॉलीवूडमधील तिच्या सुरुवातीच्या काळाबाबत खुलासा केला आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात एका चित्रपट निर्मात्यानं तिच्याकडे संतापजनक मागणी केल्याचंही तिनं यावेळी सांगितलं आहे. तसेच त्यावेळी संबंधित कृत्याबाबत आवाज न उठवल्याची खंतही तिने या मुलाखतीत बोलून दाखवली आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत.

प्रियांका चोप्रानं आपल्या मुलाखतीत पुढं सांगितलं की, 'त्यावेळी मी खूप घाबरेले होते.' तिने कोणत्याही चित्रपट निर्मात्याचं नाव न घेता सांगितलं की, एका चित्रपटाच्या सेटवर हॉट डान्स परफॉर्मन्ससाठी तिला कपडे काढायची मागणी (ask to remove cloths for hot dance) चित्रपट निर्मात्यानं केली होती. त्यानंतर प्रियांकाने पुढच्या दिवशीच संबंधित चित्रपटाला नकार दिला होता. परंतु त्यावेळी चित्रपट निर्मात्याच्या कृत्याला विरोध न केल्याचं दुःख आजही होत असल्याचं प्रियांकानं सांगितलं आहे.

हे ही वाचा -प्रियांकाला करायचं नव्हतं निकसोबत लग्न; कारण वाचून बसेल धक्का

चित्रपट निर्मात्याच्या घटनेबाबत बोलताना प्रियांकानं पुढं सांगितलं की, "मनोरंजन क्षेत्रात आल्यानंतर सुरुवातीला मला खूप भीती वाटली होती. या क्षेत्रात मी पूर्णपणे नवीन होते. मुलींबाबत असं म्हटलं जातं की, त्यांना आदर आणि सन्मान मिळवण्यासाठी फार कष्ट करावं लागत नाही, पण मला कष्ठ करायचं होतं. त्यामुळं मी या व्यवस्थेत काम केलं. यावेळी प्रियांकाने आपल्या आईबाबतही सांगितलं, ' आईने तिला सांगितलं होतं की, आयुष्यात काहीही करं पण तुला आर्थिकदृष्ट्या स्वावलंब व्हावं लागेल.'

Published by: News18 Desk
First published: March 22, 2021, 7:32 AM IST

ताज्या बातम्या