मराठी बातम्या /बातम्या /देश /

Goa Municipal Election 2021: गोव्यात 5 नगरपालिकेत 'कमळ' उमललं, 1 पालिका काँग्रेसकडे!

Goa Municipal Election 2021: गोव्यात 5 नगरपालिकेत 'कमळ' उमललं, 1 पालिका काँग्रेसकडे!

Goa municipalities election 2021 पणजी महानगरपालिकेसह अन्य 6 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे.

Goa municipalities election 2021 पणजी महानगरपालिकेसह अन्य 6 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे.

Goa municipalities election 2021 पणजी महानगरपालिकेसह अन्य 6 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे.

  • Published by:  sachin Salve

अनिल पाटील, प्रतिनिधी

पणजी, 22 मार्च :  गोव्याची राजधानी पणजी (Panjim ) महानगरपालिकेवर (Panjim Municipal Corporation Election 2021) भाजपने झेंडा फडकवल्यानंतर  6 नगरपालिकांच्या निवडणुकीतही जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, सहा पैकी 5 नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आली आहे. तर एका ठिकाणी काँग्रेसला यश आले आहे.

पणजी महानगरपालिकेसह अन्य 6 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. पणजी महानगरपालिकेमध्ये भाजपला भरघोस यश मिळवले असून 30 पैकी 25 जागा भाजप गटाने जिंकल्या आहेत तर अन्य 5 जागा काँग्रेस पुरस्कृत अपक्षांना मिळाले आहेत.

1) 10 सदस्य असणाऱ्या वाळपई नगरपालिकेमध्ये भाजप पुरस्कृत 9 उमेदवार निवडून आले आहे. या ठिकाणी  केवळ 1 जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे वाळपई नगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकावला आहे.

2) कुडचडे नगरपालिकेमध्ये मतमोजणी पार पडली. भाजप पुरस्कृत उमेदवारांनी 8 जागा  जिंकल्या आहेत तर 7 जागा काँग्रेस पुरस्कृत अपक्षानी जिंकल्या आहेत.

3) काणकोण नगरपालिकेच्या सर्व 12 जागांचा निकाल हाती आला आहे. या ठिकाणी भाजपने सर्व 12 जागा जिंकून विरोधकांना व्हाईटव्हॉश दिला आहे.

4) डिचोली नगरपालिकेमध्ये 14 जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी भाजप पुरस्कृत 9 उमेदवार निवडून आले आहेत तर अन्य उमेदवारांना काँग्रेस आणि मगोचा पाठिंबा होता असे 5 उमेदवार विजय झाले आहेत.

5) पेडणे नगरपालिकेमध्ये सहा जागा भाजप पुरस्कृत अपक्ष जिंकले असून 4 जागा काँग्रेस पुरस्कृत अपक्षांनी जिंकल्या आहेत.

6 ) दक्षिण गोव्यातील कुंकळी नगरपालिकेमध्ये काँग्रेसला यश मिळाले आह. काँग्रेस पुरस्कृत 9 उमेदवार निवडून आले असून भाजपला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

पणजी महापालिकेवर भाजपचा झेंडा

दरम्यान, पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. एकूण 30 जागांसाठी ही मतमोजणी घेण्यात आली होती. 30 पैकी 25 जागा भाजपने जिंकल्या आहे.  25 जागांवर भाजप पुरस्कृत प्रोग्रेस फॉर टूगेदर या पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

कंगना ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; या चित्रपटांसाठी पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

बहुमतासाठी लागणारा 16 जागांचा जादुई आकडा भाजपने गाठला आहे. त्यामुळे पणजी महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे.  काँग्रेसचे पुरस्कृत केवळ 5 जण निवडून आले. मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजपने जोरदार आघाडी घेतली होती. अखेर ही आघाडी आता विजयामध्ये रुपांतरीत झाली आहे.

First published:

Tags: Congress, Goa Election 2021, काँग्रेस, गोवा, भाजप