मुंबई 22 मार्च: ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-2020’ (National Film Awards 2019) सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. पंगा आणि मणिकर्णिका (Panga and Manikarnika) या चित्रपटात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कंगनासोबतच अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यानं देखील सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारावर आपलं नावं कोरलं. त्याला भोंसले या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान कंगनाचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत. सोशल मीडियाद्वारे त्यांनी कंगनावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Actor Kangana Ranaut (file photo) awarded best actress for 'Manikarnika: The Queen of Jhansi' and 'Panga'.#NationalFilmAwards2019 pic.twitter.com/A5SpAkbLEH
— ANI (@ANI) March 22, 2021
अवश्य पाहा - सुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! Chhichhore ने पटकावला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा मान वर्षभरात प्रदर्शित झालेल्या देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मनोरंजन सृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं गेल्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा एक वर्षानंतर साजरा केला जात आहे. हा पुरस्कार डायरेक्टोरेट ऑफ फ़िल्म फेस्टिवल या संस्थेतर्फे दिला जातो. ही संस्था माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत काम करते. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो.