जाहिरात
मराठी बातम्या / देश / Goa Election Result : माजी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत पाडलं, शिवसेना-राष्ट्रवादीला जे जमलं नाही ते 'आप'ने करुन दाखवलं

Goa Election Result : माजी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत पाडलं, शिवसेना-राष्ट्रवादीला जे जमलं नाही ते 'आप'ने करुन दाखवलं

Goa Election Result : माजी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत पाडलं, शिवसेना-राष्ट्रवादीला जे जमलं नाही ते 'आप'ने करुन दाखवलं

Goa Election Result 2022 : गोवा हे राज्य महराष्ट्राच्या शेजारचं राज्य आहे. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे ताकदवार प्रादेशिक पक्ष असताना अगदी शेजारील राज्य असलेल्या गोव्यात त्यांना त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आणण्यात यश आलेलं नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

पणजी, 10 मार्च : उत्तर प्रदेश (UP), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election Result 2022) निकाल आज समोर येत आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे. पण मतमोजणीच्या कलांनुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) प्रचंड मोठं घवघवीत यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे आपचा हा जलवा गोव्यातही दिसला आहे. गोव्यातील आपच्या उमेदवारांनी दिग्गज आणि प्रचंड अनुभवी असलेल्या नेत्यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे गोवा हे राज्य महराष्ट्राच्या शेजारचं राज्य आहे. महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे (NCP) ताकदवार प्रादेशिक पक्ष असताना अगदी शेजारील राज्य असलेल्या गोव्यात त्यांना त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आणण्यात यश आलेलं नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमच्याकडे ‘नोटा’ नव्हत्या म्हणून आमचा पराभव झाल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे आपच्या उमेदवारांनी ज्येष्ठ दिग्गज नेत्यांचा पराभव केला आहे. गोव्यात आपचे बाणावलीचे उमेदवार व्हिन्सी व्हिएगस यांनी ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचा पराभव केला आहे. तर वेळली मतदारसंघात क्रूझ सिल्वा यांनी माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांचा पराभव केला आहे. आपच्या या विजयानंतर आपचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ‘आप’ने दिल्लीत केलेल्या कामांची पोचपावती मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सध्या सरकारचे प्रमुख घटक आहेत. याशिवाय महाराष्ट्रात या दोनही प्रादेशिक पक्षांचा चांगलाच बोलबाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचं केंद्रीय कृषीमंत्रीपद भूषविलं आहे. शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड महत्त्वाचं स्थान आहे. तर शिवेसना म्हणजे हिदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे.. फक्त नावच भरपूर आहे. असं असतानाही या दोन पक्षांना अगदी शेजारचं राज्य असलेल्या गोव्यात विधानसभा निवडणुकीत काहीच यश मिळालेलं नाही. त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. याउलट दिल्लीत सध्या ज्या पक्षाची सत्ता आहे त्या आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी गोव्यातील दिग्गजांचा पराभव केला आहे. त्यामुळे जे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जमलं नाही ते गोव्यात आपने करुन दाखवलं, अशी सर्वसामान्यामध्ये चर्चा आहे. ( गोव्यात राणेंचा जलवा, निवडणुकीत घवघवीत यश, पती-पत्नी बनले आमदार ) गेल्या काही दिवसांपासून देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीला 7 मार्चला फुलस्टॉप लागला. त्यानंतर आज निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय. त्यामुळे पाचही राज्यांमध्ये औत्सुक्याचं वातावरण आहे. या पाचही राज्यांमध्ये सरकार नेमकं कुणाचं येतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गोव्यात भाजपने मुसंडी मारली आहे. तरीही गोव्यात आपने केलेलं कामही विसरता येणार नाही, असंच आहे. आपच्या उमेदवारांनी गोव्यात दोन मातब्बर प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव केला आहे. याशिवाय पंजाबमध्ये आपला चांगलं यश मिळालं आहे. दिल्लीचा एक प्रादेशिक पक्ष अशाप्रकारे यश संपादीत करु शकतो तर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अशक्य नाही. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांनंतर या पक्षांनी त्यावर काम केल्यास त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात