जाहिरात
मराठी बातम्या / देश / काँग्रेस नेते आणि आमदार TMC च्या मार्गावर; तोडगा काढण्यासाठी गिरीश चोडणकर, दिगंबर कामत दिल्लीत

काँग्रेस नेते आणि आमदार TMC च्या मार्गावर; तोडगा काढण्यासाठी गिरीश चोडणकर, दिगंबर कामत दिल्लीत

काँग्रेस नेते आणि आमदार TMC च्या मार्गावर; तोडगा काढण्यासाठी गिरीश चोडणकर, दिगंबर कामत दिल्लीत

काँग्रेसचे काही नेते आणि आमदार टीएमसीमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: गोवा काँग्रेसचे (Goa Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेसचे काही नेते आणि आमदार टीएमसीमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी गिरीश चोडणकर आणि दिगंबर कामत दिल्लीत पोहोचले आहेत. काल डेरेक ओब्रायनसह दोन टीएमसी खासदार गोव्यात दाखल झाले. सीएनएनन्यूज 18 च्या एका सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, ते विविध क्षेत्रातील काही प्रतिष्ठित लोकांची भेट घेणार आहेत. IPL 2021: पोलार्ड आणि कृष्णा एकमेकांना भिडले, मैदानात वाढला पारा! पाहा VIDEO आयपीएसीची (Indian Political Action Committee) एक टीम आधीच गोव्यात आहे आणि पुढील 4 महिने तेथे तैनात असणार आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस Active! पुढील पाच दिवस पावसाचे काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस गिरीश चोडणकर यांच्याच नेतृत्त्वात लढणार आहे. तर माजी आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे कार्याध्यक्षपदाचा भार सोपवण्यात आला आहे. केंद्रीय समितीनं दिगंबर कामत यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद कायम ठेवलं आहे. आमदार लुईझीन फालेरो यांच्याकडे निवडणूक समन्वय समितीचे अध्यक्षपद देण्यात आलं आहे. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याकडे प्रचाराची सूत्रे दिली आहेत. खासदार सार्दिन यांच्याकडे आर्थिक व्यवहार सोपविले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात