• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: पोलार्ड आणि कृष्णा एकमेकांना भिडले, मैदानात वाढला पारा! पाहा VIDEO

IPL 2021: पोलार्ड आणि कृष्णा एकमेकांना भिडले, मैदानात वाढला पारा! पाहा VIDEO

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) या मॅचमध्ये दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना भिडल्यानं वातावरण तापलं होतं.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) या मॅचमध्ये दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना भिडल्यानं वातावरण तापलं होतं. मुंबईचा ऑल राऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि कोलकाताचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) यांच्यात हा वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. काय घडले प्रकरण? मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅटींगच्या दरम्यान 16 ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. कृष्णा ती ओव्हर टाकत होता आणि स्ट्राईकवर पोलार्ड होता. या ओव्हरचा चौथा बॉल पोलार्डनं हलक्या हातानं टोलावला आणि तो सरळ कृष्णाच्या हातात आला. तो बॉल घेऊन कृष्णा पोलार्डच्या दिशनं धावू लागला. कृष्णाला पाहताच पोलार्ड मागे सरकला. पण तितक्यात कृष्णाच्या हातातून बॉल निसटला. त्यानंतरही कृष्णा पोलार्डला घाबरण्याचा प्रयत्न करत होता. कृष्णाची ही कृती पाहून पोलार्ड नाराज झाला. त्यानं ओव्हर संपल्यानंतर कृष्णाला सुनावलं. यावेळी पोलार्ड चांगलाच रागात होता. मात्र कृष्णा जास्त न बोलता तिथून निघून गेला. KKR चा मोठा विजय आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (MI vs KKR) मुंबईचा 7 विकेटने पराभव केला आहे. मुंबईने दिलेल्या 156 रनच्या आव्हानाचा पाठलाग कोलकात्याने 15.1 ओव्हरमध्येच पूर्ण केला. राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) 42 बॉलमध्ये नाबाद 74 रन तर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) 30 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनेच तिन्ही विकेट घेतल्या. RESULT DATA: या मॅचनंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) मोठे बदल झाले आहेत. चौथ्या क्रमांकावर असणारी मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर फेकली गेली आहे, तर कोलकाता चौथ्या क्रमांकावर आली आहे. कोलकाता आणि मुंबईने प्रत्येकी 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, पण चांगल्या नेट रनरेटमुळे कोलकाता चौथ्या आणि मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे.
  Published by:News18 Desk
  First published: