‘घरी चला’, कुटुंबीय सतत म्हणत होतं; मुंबईहून परतलेल्या 10 चालकांनी दिला नकार, वाचा का?

‘घरी चला’, कुटुंबीय सतत म्हणत होतं; मुंबईहून परतलेल्या 10 चालकांनी दिला नकार, वाचा का?

या चालकांकडून सर्वसामान्यांनाही बरंच काही शिकण्यासारखं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे : लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजूर सातत्याने प्रवास करीत आहेत. जीवघेणा प्रवास करणाऱ्या या मजुरांच्या बेकायदेशीर प्रवासामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. अनेक भागात गोंधळाचे वातावरण आहे. यामध्ये असे अनेक जणं आहेत, जे प्रशासनाला सहकार्य करीत आहेत आणि समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपलं योगदान देत आहेत. असंच एक उदाहरण नवादामधील कोशी गावात राहणाऱ्या चालकांनी समोर ठेवलं आहे.

मुंबईतील रेड झोनमधून परतले चालक

हे 10 चालक मुंबईतील रेड झोनमधून आल्यानंतर आपल्या आपल्या गावातील एका शाळेत सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी गावकऱ्यांना आणि घरातल्यांना संदेश पाठवला आहे. ते सर्व यांना भेटण्यासाठी आले होते मात्र या चालकांनी कोणालाही आपल्या जवळ येऊ दिलं नाही.

त्यापैकी एक चालक म्हणतो, मुंबईत त्यांनी कोरोनाचा कहर पाहिला आहे. त्यामुळे सर्वांनी निर्णय घेतला की ते घरी नक्की जातील मात्र 21 दिवसांपर्यंत आपल्या घरातील सदस्यांना भेटणार नाही. तिसरा लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेकजण घराच्या दिशेने रवाना झाले. यादरम्यान दहा चालक कोणत्याही ढाब्यावर चहादेखील प्यायले नाही. स्वत: तयार केलेलं अन्न खात होते. असाच त्यांनी मुंबई ते नवादापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आणि आपल्या गावी पोहोचले. येथे आल्यावरही घरी न जाते ते सेल्फ क्वारंटाईन झाले. या चालकांबाबत गावातील एका शिक्षकाला माहिती मिळताच त्यांनी सर्व चालकांची वैद्यकीय तपासणी करवून घेतली आणि त्यांना शाळेत सेल्फ क्वारटाईनमध्ये पाठवले. त्यामुळे लोकांनी या चालकांकडून शिकवण घेण्यासारखं आहे. इतरजण तर काही सुविधांसाठी क्वारंटाईनचा नियम तोडत असल्याचे दिसून आले आहे.

संबंधित - गावकरी झाले आत्मनिर्भर! 2 वर्षांत डोंगर फोडून 3 किमीचा रस्ता केला तयार

'तेव्हा डॉक्टरांनी मुलीला सांगितलं.. 70 टक्के केस हातातून गेली आहे'

 

First published: May 18, 2020, 6:04 PM IST

ताज्या बातम्या