गावकरी झाले आत्मनिर्भर! स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही नव्हता रस्ता, 2 वर्षांत डोंगर फोडून 3 किमीचा रस्ता तयार

गावकरी झाले आत्मनिर्भर! स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही नव्हता रस्ता, 2 वर्षांत डोंगर फोडून 3 किमीचा रस्ता तयार

गावकऱ्यांनी स्वत: हातात हातोडी घेऊन 3 किमीपर्यंतचा रस्ता फोडला, यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली होती.

  • Share this:

कैमूर, 18 मे : दशरथ मांझीचं नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर माऊंटन मॅनची प्रतिमा उभी राहते. ज्या माऊंटन मॅनने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर डोंगर फोडून रस्ता तयार केला होता. अशीच कहाणी एका गावात घडली आहे. येथील प्रत्येक व्यक्ती एक दशरथ मांझीचं आहे. ही कहाणी बिहारमधील कैमुर या अगदी छोट्या गावातील आहे. येथे संसाधनं नसतानाही गावकऱ्यांनी 3 किलोमीटरचा रस्ता तयार केला.

कैमूर डोंगरावरील बुढान गावातील लोकांनी कधी असा विचार केला नव्हता की ते रस्ता तयार करू शकतील. मात्र एकदा निश्चय केला आणि गावकरी छिन्नी आणि हातोडा घेऊन डोंगर फोडायला निघाले. या गावाचे प्रतिनिधित्व विधानसभेत बिहारमधील एक मंत्री बृजकिशोर बिंद करतात. मात्र निवडणुकीनंतर मंत्री येथे फिरकलेदेखील नाही. अनेकदा जिल्हा प्रशासन आणि जनप्रतिनिधींकडे गावकरी मदतीची विनंती करीत होते, मात्र कोणीच पुढं आलं नाही. गावकरी माऊंटन मॅनला आपला आदर्श मानत एकजूट झाले व डोंगर कापूर रस्ता तयार केला.

दोन वर्षांच्या मेहनतीनंतर तयार झाला रस्ता

आता गावकऱ्यांना दळणवळणासाठी त्रास सहन करावा लागत नाही. मात्र डोंगर फोडून रस्ता तयार करणं सोपं काम नव्हतं.  गावकऱ्यांना या कामासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पैसे जमा करावे लागले. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर आज रस्ता तयार झाला आहे. गावकऱ्यांनी गेल्या 2 वर्षांत 10 लाख रुपये निधी जमा केला व डोंगर फोडून रस्ता तयार केला.

हे वाचा - गळा आावळून केली हत्या अन् मृतदेह इंद्रायणी नदीत टाकला, देहूतील धक्कादायक घटना

आई...मला शेवटचं बघून घे; 21 वर्षीय तरुणाच्या कृत्याने कुटुंब हादरलं

 

First published: May 18, 2020, 5:23 PM IST

ताज्या बातम्या