Home /News /national /

19 वर्षांपर्यंत मुलीला 5 वेळा विकलं, महाराष्ट्रासह देशातील या राज्यातील मुलींवर 2 ते 25 हजार रुपयांपर्यंत लागते बोली

19 वर्षांपर्यंत मुलीला 5 वेळा विकलं, महाराष्ट्रासह देशातील या राज्यातील मुलींवर 2 ते 25 हजार रुपयांपर्यंत लागते बोली

लॉकडाऊननंतर अल्पवयीन मुलांच्या तस्करीत वाढ झाली आहे, असे तस्करीवर काम करणाऱ्या संघटनांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

  सात वय वर्षाची एक मुलगी जिच्या वयाच्या मुली, खेळायच्या, मज्जा-मस्ती करायच्या, आपलं लहानपण भरभरुन जगायच्या. मात्र, आपलं आनंदी आयुष्य जगत असताना, ती दिल्लीला कशी आली हे तिला कळलेच नाही. जेव्हा ती सात वर्षांची होती तेव्हा तिला 2000 रुपयांमध्ये विकण्यात (Girl Sold in Delhi) आले होते. आता तिचे वय 19 वर्ष इतके आहे. मागच्या 12 वर्षांमध्ये तिला पाच वेळा विकण्यात आले. शेवटच्या वेळी तिला 25 हजार रुपयांमध्ये विकण्यात आले होते. गुमलाच्या रायडीह ब्लॉक येथे राहणाऱ्या एका तरुणीचा हा भयानक अनुभव आहे. अवघ्या काही हजार रुपयांसाठी दलाल आपल्याच समाजातील मुलींचा कसा व्यवहार करतात, हे आरपीएफच्या (RPF) ‘नन्हें फरिश्ते’ (Team Nanhe Farishtey) आणि 'मेरी सहेली' (Meri Saheli) पथकाने केलेल्या कारवाईतून कळते. रांची रेल्वे विभागातील आयपीएफ सीमा कुजूर सांगतात की, मानवी तस्कर अनेकदा मुलींना ट्रेनमधून दिल्लीला घेऊन जातात. या मुली दुर्गम भागातील असतात. त्यांच्या हावभावावरून त्यांना मानवी तस्करीसाठी नेले जात असल्याचे स्पष्ट होऊन जाते. सीमा यांनी सांगितले की, 12 जून रोजी रांची रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर हटिया-आनंद विहार ट्रेन उभी होती होती. त्यातील जनरल डब्यात एक मुलगी शांत बसली होती. ‘नन्हें फरिश्ते’ आणि 'मेरी सहेली' पथकाला संशय आल्यावर मुलीची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तिने संकोच केला, नंतर तिला मोलकरीण म्हणून दिल्लीला नेले जात असल्याचे सांगितले. ती मुलगी सिमडेगा येथील राहणारी होती. तिचे वय 12 इतके होते. तिच्यासोबत दोन महिलादेखील होत्या. त्यादेखील सिमडेगा येथील रहिवासी होत्या. या मुलीला दिल्ली पोहोचवायचे बिनिता आणि आशा या दोन महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपये मिळाले. यानंतर त्या दोघांना पकडून अॅंटी ह्युमन ट्राफिकिंग यूनिटला सोपवून देण्यात आले. हेही वाचा - NIA ची मोठी अपडेट; उदयपूरमधील घटना गुजरात आणि महाराष्ट्रातील हत्यांशी जोडणार डोमेस्टिक हेल्पच्या नावावर मुलींची विक्री - एटीएसईसी इंडिया (अॅक्शन अगेंस्ट ट्रैफिकिंग अँड सेक्शुअल एक्सप्लाटेशन ऑफ चिल्ड्रेन) या अँटी ट्रॅफिकिंगवर काम करणारी संस्था एटीएसईसी इंडियाचे झारखंड को-ऑर्डिनेटर संजय मिश्रा यांनी सांगितले की, मानवी तस्करी हे देखील शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थांप्रमाणेच जगातील सर्वात मोठे आव्हान आहे. लहान लहान हजारो मुली आहेत ज्यांना घरकामासाठी किंवा इतर कारणांसाठी विकले जाते. लॉकडाऊननंतर तस्करीच्या घटनांमध्ये वाढ - महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 2020 दरम्यान मानवी तस्करीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. 2018 मध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 1064 मुलींची तस्करी झाली होती, ती 2019 मध्ये 923 आणि 2020 मध्ये 784 पर्यंत कमी झाली. पण लॉकडाऊननंतर अल्पवयीन मुलांच्या तस्करीत वाढ झाली आहे, असे तस्करीवर काम करणाऱ्या संघटनांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, देशातील केवळ तीन-चार राज्यांमध्ये मुलींच्या तस्करीचे सर्वाधिक प्रकरणे आहेत. त्यामध्ये आसाम, महाराष्ट्र, तेलंगणा, झारखंड, आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. आसाममधील कोक्राझारमध्ये तस्करीविरोधी काम करणाऱ्या निदान फाऊंडेशन या एनजीओने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे लोकांच्या जीवनात खूप फरक पडला आहे.  झारखंड हे मानवी तस्करी करणाऱ्या पहिल्या पाच राज्यांपैकी एक आहे जिथे मोठ्या संख्येने अल्पवयीन मुलींची तस्करी केली जाते. झारखंडची राजधानी रांची, खुंटी, गुमला, चाईबासा इत्यादी जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मुलींना प्रथम दिल्लीत नेले जाते. त्यानंतर तेथून राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये पाठवले जाते. एनटीएसईसीचे झारखंड को-ऑर्डिनेटर संजय मिश्रा सांगतात की, दिल्लीतच 1200 पेक्षा जास्त प्लेसमेंट एजन्सी आहेत ज्या झारखंडमधून मुली आणतात. या सर्व बनावट एजन्सी आहेत. दलाल त्यांना खोटं बोलून दिल्लीत आणतात. दलाल 5000 ते 25 हजारांपर्यंत मुलींची विक्री करतात. त्यांना झारखंड ते दिल्ली जाण्यासाठी रेल्वे किंवा विमान तिकीट दिले जाते. हेही वाचा - महिलेने 3 निष्पाप मुलींसह उचलले भयानक पाऊल, कुटुंबीयांना माहिती मिळताच बसला धक्का काय आहे रेल्वेचे नन्हे फरिश्ते अभियान -  मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वेकडून देशभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. रांची रेल्वे विभागातील या मोहिमेचे नोडल अधिकारी डीएससी प्रशांत कुमार यादव देखील सांगतात की, मानवी तस्करी रोखण्यासाठी, नन्हें फरिश्ते आणि मेरी सहेली ही दोन पथके आहेत. दोन्ही पथके एकत्र काम करतात. रांची रेल्वे विभागात, एका सक्रिय  नन्हें फरिश्तेच्या टीमने अलीकडेच अनेक मुलींची सुटका केली आहे. यासोबतच दलालांनाही पकडण्यात आले आहे.
  • 25 एप्रिल 2022: 16 वर्षीय गुमला येथील अल्पवयीन मुलाला रांचीहून दिल्लीला नेले जात होते. शेख अपू नावाचा दलाल तिला घेऊन जात होता. दिल्लीत त्याने तिला एका शंकराला दिले. त्या बदल्यात त्याला 20 हजार रुपये मिळायचे.
  • 15 जानेवारी 2022: सिमडेगा येथील रहिवासी १७ वर्षीय अनिता कुमारी हिला अजगुत लोहरा हा दलाल दिल्लीला घेऊन जात होता. त्याला कमिशन म्हणून 25 हजार रुपये मिळायचे.
  2018 पासून रेल्वे संरक्षण दलाने (RPF) 50 हजार मुलांची सुटका केली आहे. आरपीएफच्या मानवी तस्करीविरोधी युनिटनेही तस्करांना पकडले आहे. ही टीम देशभरात 740 ठिकाणी मानवी तस्करी रोखण्यासाठी काम करते.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Railway, Save girl life

  पुढील बातम्या