नवी दिल्ली, 8 मे : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली होती. मित्राच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape on Minor) केला गेला होता. याप्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कैलाश कुमार लाल दास असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO-ग्रेड II) असल्याचे सांगितले जात आहे. हा आरोपी आरके पुरम येथील रहिवासी आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
दिल्ली पोलिसांनी दोन महिन्यांच्या शोधानंतर मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीची ओळख सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO-ग्रेड II) कैलाश कुमार लाल दास म्हणून झाली आहे. तो उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आहे. आरोपी कैलाश कुमार लाल दासने पोलिसांना सांगितले की, तो पीडितेच्या वडिलांचा गेल्या सहा-सात वर्षांपासून मित्र असून, तो वारंवार त्यांच्या घरी येत असे. दास म्हणाला की, त्याने आपल्या मित्राला वचन दिले होते की तो आपल्या मुलीला योग्य नोकरी मिळवून देण्यास मदत करेल. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तिला 7 मार्च रोजी मोतीबाग मेट्रो स्टेशनजवळ दासजवळ सोडले.
हेही वाचा - सुनेनं भांडण करू नये म्हणून सोपवलं तांत्रिकाच्या हातात! आयुष्यातले 79 दिवस घडला असा भयंकर प्रकार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi News, Police, Rape on minor