मुंबई, 27 जून : नवीन कामगार कायदा (New Labor Code) जुलै महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे. त्याची अंमलबजावणी सर्व कर्मचाऱ्यांवर लक्षणीय परिणाम करेल. या नवीन लेबर कोडमध्ये एक चांगली गोष्ट समाविष्ट करण्यात आली आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याने कंपनी सोडल्यानंतर कंपनीला जे काही देणे असेल ते पूर्ण पैसे दोन दिवसात मिळतील. सध्याच्या कोडनुसार, आतापर्यंत हे फुल अँड फायनल पेमेंट 30 ते 60 (सरासरी 45 दिवस) दिवसात मिळते. कर्मचार्यांच्या हितासाठी नवीन लेबर कोडमध्ये इतरही अनेक गोष्टी आहेत, जसे की त्यांचे पगार, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित काही बदल. या नव्या लेबर कोडच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांचे इन-हँड पगार कमी होणार असले तरी पीएफमधील योगदान मात्र वाढणार आहे. वाढीव योगदान केवळ कर्मचार्यांच्या बाजूने असेल, परंतु कंपनी कर्मचार्यांच्या खात्यातही तेवढीच रक्कम जमा करेल. पोस्ट ऑफिस बचत खाते आणि पेमेंट बँक खाते लिंक कसं करायचं? काय मिळतील फायदे? आठवड्यातून तीन दिवस सुट्टी कामगारांना आठवड्यातून तीन दिवस सुटी असावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर आठवड्यातून केवळ 4 दिवस काम करावे लागणार आहे. परंतु दिवसातील कामाचे तास 9 वरून 12 पर्यंत वाढवले जातील. कंपनीने 12 तासांच्या कामाची शिफ्ट लागू केल्यास कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची सुट्टी द्यावी लागेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 48 तास काम करावे लागणार आहे. 12 तासांच्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना दिवसातून दोनदा अर्ध्या तासाची सुट्टी मिळेल. Nepal Bans Pani Puri: नेपाळमध्ये पाणीपुरी विक्रीवर बंदी, काय आहे संपूर्ण प्रकरण? पगार कमी होणार नव्या कामगार कायद्यात कामगारांचे मूळ वेतन (Basic Salary) एकूण पगाराच्या किमान 50 टक्के ठेवण्याची तरतूद केली जाऊ शकते. यामुळे भविष्य निर्वाह निधीमध्ये मालक आणि कर्मचारी यांचे योगदान वाढेल. पण यामुळे टेक होम सॅलरी कमी होईल. म्हणजेच दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पैसे येतील. नवीन कायद्यांनुसार निवृत्तीनंतर मिळणारी एकरकमी रक्कम आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. दरवर्षीच्या सुट्ट्यांवर काय परिणाम होईल? नव्या कामगार कायद्यात कर्मचाऱ्यांच्या सुट्याही तर्कसंगत करण्यात आल्या आहेत. नवीन कायद्यांनुसार, कर्मचारी दरवर्षी सुट्ट्यांच्या बदल्यात पैसे घेता येतील. आता कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर पडल्यानंतरच शिल्लक सुट्ट्यावर पैसे मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.