जाहिरात
मराठी बातम्या / देश / OMG! आता चहाही फोडणार घाम, बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' गोष्टीचे भाव वधारले

OMG! आता चहाही फोडणार घाम, बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' गोष्टीचे भाव वधारले

चहा

चहा

हाच आल्याचा चहा आता घाम फोडणार आहे. बऱ्याचदा जेवणात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यात किंवा चटणीमध्येही आल्याचा वापर होतो. त्यामुळे आलं वापरणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.

  • -MIN READ Local18 Rajasthan
  • Last Updated :

पीयूष पाठक प्रतिनिधी अलवर : चहा आपलं मन प्रसन्न करतो, त्यामुळे सकाळी उठल्यावर असो किंवा आपण थकल्यावर असो दोन घोट चहाचे हवेतच असं बऱ्याचदा होतं. चहाची चव वाढते ती आल्यामुळे. आल्याचा चहा हा अगदी तरतरी आणणारा असतो. मात्र आता हाच आल्याचा चहा आता घाम फोडणार आहे. बऱ्याचदा जेवणात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यात किंवा चटणीमध्येही आल्याचा वापर होतो. त्यामुळे आलं वापरणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. आल्याचे दर वाढले असून आता खिशाला परवडेनासे झाले आहे. 250 रुपयांना आलं बाजारात मिळत आहे. आल्याच्या दरात अचानक वाढ झाली.  15 दिवसांपूर्वी बाजारात आल्याचा किरकोळ दर 125 रुपये प्रतिकिलोच्या आसपास होता, मात्र रविवारी त्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बाजारात आल्याच्या दरात दुपटीने वाढ झाल्याने चहा विक्रेता ते गृहिणी सगळ्यांच्याच खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना आले खरेदी करणे कठीण झाले आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात आल्याचे दर गगनाला भिडले आहेत. मंडईतील भाजी विक्रेते सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार १० दिवसांपूर्वी आल्याचा भाव १२० ते १३० रुपये किलो होता, मात्र रविवारी आल्याचा भाव २४० ते २५० रुपये किलो झाला. भाव वाढण्यामागील कारण म्हणजे बाजारात आल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आल्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे.

या चहामध्ये वापरलं जातं 24 कॅरेट सोनं, सोशल मीडियावरल लोक काय म्हणताय वाचा…
News18लोकमत
News18लोकमत

सुनील पुढे म्हणाले की, अलवरमध्ये आले जयपूरच्या मुहाना मंडीतून येते. बाजारात नवीन आल्याची आवक सुरू झाली आहे. नवीन आल्याच्या आवकमुळे आगामी काळात दर कमी होऊ शकतात. हंगामी आजारांमुळे लोक मोठ्या प्रमाणात आले खरेदी करत आहेत.

तुम्हीही चहाआधी पाणी पिता का? वाचा आरोग्यावर काय होतो परिणाम

अवकाळी पाऊस, बदलणारं हवामान यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. नव्या आल्याची आवक वाढल्यानंतर दर खाली उतरतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: health , money , rajsthan , tea
  • First Published :
जाहिरात
जाहिरात