जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हीही चहाआधी पाणी पिता का? वाचा आरोग्यावर काय होतो परिणाम

तुम्हीही चहाआधी पाणी पिता का? वाचा आरोग्यावर काय होतो परिणाम

तुम्हीही चहाआधी पाणी पिता का? वाचा आरोग्यावर काय होतो परिणाम

काही जण चहा पिण्याच्या आधी एक ग्लास पाणी पितात. या सवीमुळे आरोग्यावर काही परिणाम होतात का? वाचा न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियांका रोहतगी काय सांगतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 05 एप्रिल : भारत हा चहाप्रिय देश आहे. भारतात घरोघरी चहा प्यायला जातो. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी, झोप घालवण्यासाठी, मूड तयार करण्यासाठी हमखास चहा प्यायला जातो. असं असलं तरी चहामुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो हे आपल्या माहिती आहेच. चहामुळे होणारं पित्त कमी करण्यासाठी काही जण चहा पिण्याच्या आधी एक ग्लास पाणी पितात. यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो का, शास्त्रीयदृष्ट्या त्याला काही आधार आहे का, याबाबत बेंगळुरूतल्या अपोलो हॉस्पिटलच्या चीफ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियांका रोहतगी यांनी माहिती दिली आहे. 1/4 : चहा आणि कॉफी पित्तकारक असतात. त्यांच्यामुळे पोटात गॅसेस तयार होतात. डॉ. प्रियांका यांच्या मते खूप कमी जणांना याची माहिती असते. चहाची पीएच व्हॅल्यू 6 असते, तर कॉफीची 5 असते. त्यामुळे अ‍ॅसिड निर्मिती जास्त झाली, तर अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. कॅन्सर, अल्सर होण्याचीही शक्यता असते. कलिंगड नैसर्गिकपणे पिकवले आहेत की रासायनिक पद्धतीने? या टिप्सचा मदतीने चटकन ओळखा 2/4 : चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन नावाचा एक घटक असतो. यामुळे चहा-कॉफीची चव थोडी कडवट लागते. तसंच थोडीशी नशाही चढते; मात्र हे टॅनिन पेशींना घातक ठरतं. यामुळे पोटाच्या तक्रारी निर्माण होतात. अस्वस्थ वाटणं, उलटी, पोटदुखी अशा तक्रारी होतात. किती प्रमाणात चहा-कॉफीचं सेवन होतं व त्याचा परिणाम काय होतो, हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं; मात्र चहा पिण्याआधी पाणी प्यायलं तर शरीरातला ओलावा टिकून राहतो व पीएचची पातळी योग्य राहते. 3/4 : डॉ. प्रियांका यांच्या मते, चहा पिण्याआधी एक ग्लास पाणी प्यायलं, तर त्याचा एक थर पोटात तयार होतो. यामुळे चहा-कॉफीमुळे निर्माण होणाऱ्या पित्ताचा प्रभाव कमी होतो. पाण्यामुळे तोंडातले बॅक्टेरियाही निघून जातात. चहामुळे तोंड व दातही खराब होतात; मात्र आधी पाणी प्यायल्यामुळे तिथेही एक स्तर तयार होऊन तोंड व दातांवरचा चहाचा परिणाम कमी होतो. तुमच्या किचनमधील ‘या’ पदार्थात कॅन्सरला रोखण्याची क्षमता   4/4 : डॉ. प्रियांका रोहतगी यांच्या म्हणण्यानुसार चहा किंवा कॉफी प्यायच्या 15 मिनिटं आधी पाणी प्यायलं तर त्याचा जास्त उपयोग होतो. यामुळे चहाच्या अ‍ॅसिडचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होते. तसंच कॅफिनचा प्रभावही यामुळे कमी होतो. चहा आणि कॉफी दोन्हीचा अतिरेक आरोग्याविषयीच्या गंभीर समस्या निर्माण करू शकतो; मात्र चहा-कॉफी पिण्याआधी पाणी पिण्याची सवय यापासून थोडा दिलासा नक्की देऊ शकते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात