रामकुमार नायक (महासमुंद), 12 मे : छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बॉईज हॉस्टेलमध्ये भूत असल्याची चर्चा रंगली आहे. रात्री मुलीच्या हसण्याचा भितीदायक आवाज येतो. वसतिगृहात जाताना कोणी दिसत नाही तरीही आवाज येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान याबाबत पोलिसांचे पथकही तपासासाठी पाठवण्यात आले. पोलीस असतानाही हसण्याचे आवाज येत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान याप्रकरणी मेडीकल कॉलेजच्या डीन डॉ. यास्मिन खान यांनी ही अफवा असल्याचे म्हटले आहे. व्हायरल व्हिडिओची चौकशी केल्यानंतर हा व्हायरल व्हिडिओ मुलांच्या वसतिगृहातील भूतांच्या संबंधातील केवळ एक भ्रम असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा अफवा टाळून विद्यार्थी घाबरून न जाता वसतिगृहात निवांत रहा असे त्या म्हणाल्या. यासंदर्भात पोलीस अधीक्षक महासमुंद यांनाही कळविण्यात आले आहे.
सेप्टिक टँक स्वच्छ करायला गेले पण मृतेदहच बाहेर निघाले, पाच मजुरांचा मृत्यू; परभणीतील घटनाशासकीय वैद्यकीय महाविद्यालय महासमुंदच्या वसतिगृहात 54 विद्यार्थी राहतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बहुतांश विद्यार्थी घरी गेले आहेत. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी वसतिगृहात अवघे 5 ते 6 विद्यार्थी होते.
वसतिगृहात भीतीदायक आवाज येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाकडे केली होती. दरम्यान घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात राहण्यास भीत होते. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याप्रकरणीही पोलिसांनी तपास केला आहे. महासमुंद जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव म्हणाले, याविषयी माहिती मिळताच आमचे पोलिस पथक वसतिगृहात गेले. कॅम्पसमध्ये जेथून आवाज येत होता तिथे फक्त 5-6 विद्यार्थी होते.
काँग्रेस नेत्यावर गोळीबार, कारमध्ये दबा धरून बसले होते हल्लेखोर; घटना CCTVत कैद
मात्र, त्या खोलीत एक टीव्ही आणि स्पीकरही होता, जो ब्लूटूथद्वारे जोडला होता. अशा परिस्थितीत काही खोडकरांनी ब्लूटूथ स्पीकरद्वारे हे आवाज जाणूनबुजून वाजवले असण्याची शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे ते म्हणाले.