परभणी, 12 मे : परभणीत सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. पाच मजुरांच्या मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, परभणीतील सोनपेठ तालुक्यातल्या भाऊचा तांडा शिवारात ही घटना घडली. मारूती राठोड यांच्या शेतात सेप्टिक टँकची स्वच्छता करण्यासाठी रात्री मजूर आले होते. ते स्वच्छता करायला टाकीत उतरले पण बाहेर आलेच नाहीत. रात्रीच्या अंधारामुळे हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये चौघांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी आहे. शेख सादेक वय ४५, शेख शाहरुख वय २०, शेख जुनेद २९, शेख नाविद वय २५, शेख फिरोज वय २५ अशी मृतांची नावे आहेत. यामध्ये शेख साबेर हा जखमी झाला आहे. काँग्रेस नेत्यावर गोळीबार, कारमध्ये दबा धरून बसले होते हल्लेखोर; घटना CCTVत कैद घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाच जणांचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. हा प्रकार कसा घडला? याचा तपास करण्यासाठी जखमी व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर स्पीड ब्रेकरमुळे 3 गाड्यांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू शहापूर शेनवे येथील 5 जण घोटी येथील हॉस्पिटल मधून कारने रात्रीच्या वेळी शहापूर येथे येत असताना भीषण अपघात झाला. शेरपोली घाटात स्पीड ब्रेकरवर एका पीकअप गाडीने ब्रेक घेतला तिच्या पाठीमागे असलेली कार पीकअप गाडीवर जोरदार जाऊन आदळली. त्यानंतर कारच्या मागून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला. कारमध्ये दोन महिला आणि तीन पुरुष होते ते गाडीतच चिरडले गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.