चंद्रपूर, 12 मे : चंद्रपूरमध्ये गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. सुदैवाने संतोष रावत या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. गोळी त्यांच्या डाव्या हाताला लागून गेल्यानं जखम झाली आहे. गोळीबारात संतोष रावत यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. हल्लेखोरांनी गोळीबार करताच गाडीतून पळ काढला. या हल्ल्या प्रकरणी संतोष रावत यांनी मुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत असून हल्ला करत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. मुंबई-नाशिक महामार्गावर स्पीड ब्रेकरमुळे 3 गाड्यांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/c26x6gesnb
— News18Lokmat (@News18lokmat) May 12, 2023
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुल येथे हल्लेखोर गाडीने आले होते. गोळीबार केल्यानतंर हल्लेखोर नागपूर मार्गे फरार झाले. संतोष रावत हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुल शाखेतून स्कूटीवरून घरी जात होते. तेव्हा बँकेसमोर काही अंतरावर हल्लेखोर दबा धरून बसले होते. त्यातील बुरखाधारक व्यक्तीने संतोष रावत यांच्यावर गोळीबार केला.