मराठी बातम्या /बातम्या /देश /वाहतूक पोलिसाच्या अंगावरच घातली कार, चेकिंगसाठी कार रोखण्याच्या प्रयत्नात असताना गुंडांचा वाहतूक पोलिसावरच हल्ला

वाहतूक पोलिसाच्या अंगावरच घातली कार, चेकिंगसाठी कार रोखण्याच्या प्रयत्नात असताना गुंडांचा वाहतूक पोलिसावरच हल्ला

वाहतूक पोलिसाच्या अंगावरच घातली कार

वाहतूक पोलिसाच्या अंगावरच घातली कार

कारमधून आलेल्या काही तरुणांनी वाहतूक पोलिसांच्या अंगावरच कार घातली. इतकंच नाही तर त्या कारच्या बोनेटवर पडलेल्या वाहतूक पोलिसाला 200 मीटरपर्यंत ओढत तसंच नेलं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  गाझियाबाद, 04 फेब्रुवारी :  वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सरकार वेळोवेळी सूचना देते. मात्र नागरिक त्याबाबत बेफिकीर असतात. नियम कडक करूनही नागरिक ते बिनधास्तपणे मोडतात. वाहतुकीचे नियम पाळण्याची सक्ती केल्यास काही गुंड वाहतूक पोलिसांवरच अरेरावी करत असल्याचेही काही प्रकार घडले आहेत. दिल्लीजवळ गाझियाबाद भागात नुकतीच अशी घटना घडली. कारमधून आलेल्या काही तरुणांनी वाहतूक पोलिसांच्या अंगावरच कार घातली. इतकंच नाही तर त्या कारच्या बोनेटवर पडलेल्या वाहतूक पोलिसाला 200 मीटरपर्यंत ओढत तसंच नेलं. झाल्या प्रकाराबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या संदर्भात आज (4 फेब्रुवारी) सकाळी एकाला पकडण्यात आलं आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे.

  वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली, तरी दररोज अशा घटनांमध्ये वाढच होते आहे. गाझियाबादमधल्या इंदिरापुरमच्या क्षिप्रा कटच्या जवळ शुक्रवारी (3 फेब्रुवारी) एक घटना घडली. त्यात एका कारनं थेट वाहतूक पोलिसालाच धडक दिली. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. यात वाहतूक पोलिसाला बराच मार लागलाय. इंदिरापुरम पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय.

  हेही वाचा - देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगलं, पण भरतीचा सराव करताना तरुणाला मृत्यूने गाठलं

  इंदिरापुरम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अनुराग यादव यांच्यासोबत वाहतूक पोलिसांचा एक गट क्षिप्रा कटजवळ चेकिंग करत होता. त्याचवेळी एक कार उलट दिशेला आली. अनुराग यादव यांनी त्या कारला थांबवण्याचा प्रयत्न करत केला, मात्र कारमधल्या तरुणांनी थेट त्यांच्या अंगावरच गाडी घातली. त्यामुळे ते गाडीच्या बोनेटवर लटकले. असं असूनही गुंडांनी गाडी न थांबवता 200 मीटर तशीच घासत नेली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. याचा फायदा घेत गुंड गाडी घेऊन फरार झाले.

  वाहतूक पोलिसांना गुंगारा देऊन सटकणारे अनेक गुंड असतात. मात्र गाझियाबादमध्ये चक्क गुंडांनी पोलिसांच्या अंगावरच कार घातली. पोलिसांच्या तपासणीपासून वाचण्यासाठी त्या गुंडांनी शेजारून जाणाऱ्या एका बाईकस्वारालाही धडक दिली. त्यात बाईकस्वार जबर जखमी झाला आहे. वाहतूक पोलीस अनुराग यादव यांच्यासोबत त्या बाईकस्वाराला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वाहतूक पोलिसानं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

  शुक्रवारी घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे. त्या आधारावर कारचा शोध घेतला असता, पोलिसांनी आज सकाळी (4 फेब्रुवारी) एका आरोपीला अटकही केलीय. इतर आरोपींना शोधण्यासाठी पकडलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे. सरकारी कामात अडथळा आणणं आणि सरकारी कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्याबाबत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींच्या कारची ओळख पटली आहे. आता त्यावरून आरोपींची शोधमोहीम सुरू आहे.

  First published:

  Tags: PHOTOS VIRAL