मराठी बातम्या /बातम्या /देश /देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगलं, पण भरतीचा सराव करताना तरुणाला मृत्यूने गाठलं

देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगलं, पण भरतीचा सराव करताना तरुणाला मृत्यूने गाठलं

डॉक्टरांनी म्हटलं की, फिजिकल अॅक्टिव्हीटी करणाऱ्या तरुणांनी वेळोवेळी आरोग्य चाचणी केली पाहिजे. त्यांनी हृदय, फुफ्फुस, रक्तदाब इत्यादी तपासणी करणं आवश्यक आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

पिथौरागड, 04 फेब्रुवारी : देशसेवा करण्यासाठी अनेक तरुण लष्करात भरती होत असतात. यासाठी असलेल्या शारिरीक चाचणीसाठी दररोज घाम गाळून सराव करतात. भरतीची तयारी करणाऱ्या एका १८ वर्षाच्या तरुणाचा अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं जातंय. मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच समजू शकेल. उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात ही घटना घडलीय. दरम्यान, डॉक्टरांनी तरुणांना अशा प्रकारच्या सरावावेळी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिथौरागडमधील कासनी गावातील पारस मनोज कसन्याल हा भरतीची तयारी करत होता. तो दररोज पाच किमी धावत मैदानावर जायचा. तिथे पुन्हा सराव करत असे. शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे व्यायाम करत होता. त्यावेळी अचानक जमीनीवर कोसळला. त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचं सोबतच्या मुलांनी म्हटले. तिथून पारसला रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पारसच्या मृत्यूने कुटुंबियांसह गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे.

हेही वाचा : चक्क प्राण्याच्या विष्ठेपासून बनते सर्वात महाग कॉफी, किंमत ऐकून आश्चर्य वाटेल

जिल्हा रुग्णालयाचे फिजिशियन डॉक्टर धर्मशक्तू यांनी म्हटलं की, फिजिकल अॅक्टिव्हीटी करणाऱ्या तरुणांनी वेळोवेळी आरोग्य चाचणी केली पाहिजे. त्यांनी हृदय, फुफ्फुस, रक्तदाब इत्यादी तपासणी करणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हाय प्रोटिन, फॅटी डायट घेऊ नये. तरुणांनी व्यसनांपासूनही दूर रहावं असा सल्ला त्यांनी दिला.

First published:

Tags: Uttarakhand