मुंबई, 11 मार्च : भारताच्या दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या पुढाकारानं पाकिस्तानात अडकलेल्या गीता (Geeta) या मुकबधीर मुलीला 2015 साली भारतामध्ये आणण्यात आले होते. आता या घटनेच्या तब्बल सहा वर्षांनी गीताला महाराष्ट्रामध्ये तिची आई मिळाली आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'डॉन' ने दिलेल्या वृत्तानुसार जगप्रसिद्ध ईधी वेल्फेयर ट्रस्टचे माजी प्रमुख दिवगंत अब्दुल सत्तार ईधी यांच्या पत्नी बिलकीस ईधी (Bilquees Edhi) यांनी गीताची तिच्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या आईशी भेट घडवून आणण्यात पुढाकार घेतला.
'हे' आहे गीताचे खरे नाव
बिलकीस यांनी दिलेल्या माहितीनुसार 'गीता माझ्या संपर्कात होती. तिने मला तिच्या खऱ्या आईशी भेट झाल्याची माहिती दिली आहे. गीताचे खरे नाव राधा वाघमारे आहे. तिला तिच्या आईची महाराष्ट्रातील नायगावमध्ये मिळाली. बिलकीस यांच्या दाव्यानुसार त्यांना गीता एका रेल्वे स्टेशनच्या बाहेर पहिल्यांदा दिसली होती. त्यावेळी तिचे वय 11 ते 12 वर्षे इतके होते. त्यानंतर त्यांनी गीताला कराचामधील त्यांच्या संस्थेच्या केंद्रात ठेवले होते.
'गीता पाकिस्तानात चुकून आली होती. ती कराचीमध्ये आम्हाला भेटली तेंव्हा असाह्य होती. आम्ही सुरुवातीला तिचे नाव फातिमा ठेवले होते. मात्र त्यानंतर आम्हाला ती हिंदू असल्याचे समजल्यानंतर तिचे नाव गीता ठेवण्यात आले. गीताला बोलता आणि ऐकता येत नाही, असेही बिलकीस यांनी सांगितले.
(हे वाचा- 'भूक से मारो' : पाकिस्तानी संगीतकाराचा इम्रान सरकारवर गाण्याच्या माध्यमातून निशाणा, VIDEO होतोय व्हायरल )
गीताच्या खऱ्या आईचे नाव मीना आहे. DNA चाचणीमधूनही त्याची खात्री करण्यात आली आहे. गीताच्या खऱ्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईने दुसरं लग्न केले, अशी माहिती देखील बिलकीस यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Geeta, India, Maharashtra, Mother, Pakistan, Sushma swaraj