नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बलात्काराची अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घडना घडली आहे. एका 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बागेमध्ये फिरायला आलेल्या तरुणीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या पीडित तरुणी रुग्णालयात उपचार घेत असून तिची स्थिती अतिशय नाजूक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. बागेत फिरायला गेलेल्या 22 वर्षाच्या तरुणीवर 4 नराधमांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पीडित तरुणीला रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं. पण पीडितेला शुद्ध आल्यानंतर ती सारखी बेशुद्ध पडत आहे तर तिला मोठा मानसिक धक्का बसला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे आपल्या देशात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली कुठेही सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नवी दिल्लीतील सराय काले खां (Sarai Kale Khan) इथे बस स्थानकाजवळील इंद्रप्रस्थ पार्क (Indraprastha Park) मध्ये हा प्रकार घडला आहे. अत्याचार होत असताना तरुणीने प्रचंड आरडाओरड केली. ‘मुझे छोड दो भैय्या’ अशा अनेक विनवण्या केल्या पण तिचं कोणीही ऐकलं नाही किंवा कोणीही मदत केली नाही. इतर बातम्या - युतीवर वाद अद्याप मिटला नाही, शिवसेनेनं दिला नवा फॉर्म्युला! सनलाईट कॉलनी परिसरातील घटना स्थानिक पोलीस स्टेशनच्या म्हणण्यानुसार, प्रकरण सनलाईट कॉलनी परिसरातील आहे. पोलिसांनी अज्ञात नराधमांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना पकडण्यासाठी सात पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित मुलीची मानसिक प्रकृती ठीक नाही. तिला सध्या काहीही सांगता येत नाहीये. पीडित तरुणी 22 वर्षांची आहे. या घटनेने तरुणीला मोठा धक्का बसला आहे. ‘मुझे छोड़ दो भैया…मुझे छोड़ दो’ असं ती सारखं बडबडत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. इतर बातम्या - BREAKING: काँग्रेसला धक्का दिल्यानंतर आता उर्मिला मातोंडकर उचलणार मोठं पाऊल! पीडित तरुणीला आरोपींनी केली मारहाण एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणीला आरोपींनी मारहाण केली. जेव्हा तिने बलात्काराचा विरोध केला त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली. आरोपींनी तरुणीचे सर्व कपडे फाडले. त्यावेळी तिच्या शरीरावर ओरबाडल्याचे निशाण आहेत. सोमवारी सकाळी काही लोक बागेत फिरायला गेले असता, त्यांनी पीडित मुलीला विवस्त्र बेशुद्ध अवस्थेत पडलेलं पाहिलं. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर बातम्या - राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, आठवडाभरात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची ‘कॉलर स्टाईल’ बंद होणार? पाहा SPECIAL REPORT
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.