मराठी बातम्या /बातम्या /देश /

गांधीजींच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी मागितली होती 'माफी'; इतिहास तज्ज्ञाने सादर केलं 'ते' पत्र

गांधीजींच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी मागितली होती 'माफी'; इतिहास तज्ज्ञाने सादर केलं 'ते' पत्र

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याने गदारोळ उठायचं कारण काय, असा सवाल इतिहास तज्ज्ञ विक्रम संपत यांनी केला आहे. गांधींचं ते पत्रही त्यांनी सादर केलं आहे आणि ते गांधी आश्रमातच उपलब्ध असल्याचंही म्हटलं आहे.

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याने गदारोळ उठायचं कारण काय, असा सवाल इतिहास तज्ज्ञ विक्रम संपत यांनी केला आहे. गांधींचं ते पत्रही त्यांनी सादर केलं आहे आणि ते गांधी आश्रमातच उपलब्ध असल्याचंही म्हटलं आहे.

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याने गदारोळ उठायचं कारण काय, असा सवाल इतिहास तज्ज्ञ विक्रम संपत यांनी केला आहे. गांधींचं ते पत्रही त्यांनी सादर केलं आहे आणि ते गांधी आश्रमातच उपलब्ध असल्याचंही म्हटलं आहे.

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आणि महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून देशात सध्या मोठी चर्चा सुरू असून, उलटसुलट चर्चा सुरू आहेत. `स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अनेक खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. सावरकर कारागृहात असताना त्यांनी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून इंग्रजांकडे दया याचिका दाखल केली होती,` असं विधान राजनाथसिंह यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून ही चर्चा सुरू झाली आहे; मात्र इतिहास अभ्यासक विक्रम संपत यांनी काही पुरावे (Evidence) सादर केले असून, त्यातून राजनाथसिंह यांचं विधान खरं असल्याचं सिद्ध होत आहे.

एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं होतं, `जे लोक मार्क्सवादी आणि लेनिनवादी विचारसरणीवर विश्वास ठेवतात, त्यांनी वीर सावरकरांचा फॅसिस्ट म्हणून प्रचार केला आहे. परंतु, ते एक स्वातंत्र्यसेनानी होते. सावरकरांविषयी द्वेष तथ्यहीन आहे. सावरकर हे देशाचे पहिले संरक्षणतज्ज्ञ होते. दुसऱ्या देशांसोबत संबंध कसे असावेत, याची त्यांना पूर्ण जाण होती. याविषयी त्यांचं धोरण स्पष्ट होतं. सावरकर हिंदुत्वाला धर्मापेक्षा अधिक श्रेष्ठ समजत.`

'ते कधीही मुस्लिमांचे शत्रू नव्हते',वीर सावरकरांबाबत मोहन भागवतांची प्रतिक्रिया

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणातल्या सावरकर आणि महात्मा गांधींबद्दलच्या विधानावरून वाद सुरू झाला आहे. यावर इतिहासतज्ज्ञ विक्रम संपत यांनी ट्विटद्वारे काही पुरावे सादर केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गांधी सेवाग्राम आश्रमाच्या (Gandhi Sevagram Ashram) वेबसाइटवर महात्मा गांधी यांच्या कार्याविषयी देण्यात आलेल्या माहिती संग्रहात गांधीजींनी वीर सावरकरांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख आहे. महात्मा गांधी यांचं हे पत्र 'कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी'च्या या ग्रंथाच्या खंड 19च्या पृष्ठ क्रमांक 348 वर उपलब्ध आहे.

या पत्रात महात्मा गांधी यांनी वीर सावरकरांना लिहिलं आहे, `प्रिय सावरकर, माझ्याकडे तुमचं पत्र आहे. तुम्हाला सल्ला देणं अवघड आहे. परंतु, मी सुचवतो की तुम्ही तुमच्या भावानं केलेला गुन्हा पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा होता, हे स्पष्ट करण्यासाठी या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करणारी एक छोटी याचिका तयार करा. मी ही सूचना करत आहे, जेणेकरून जनतेचं लक्ष या प्रकरणावर केंद्रित करता येईल. मी तुम्हाला आधीच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे मी या प्रकरणात माझ्या मार्गानं जात आहे.` यानंतर महात्मा गांधी यांनी हे प्रकरण चर्चेत यावं यासाठी 26 मे 1920 रोजी 'यंग इंडिया'मध्ये एक लेखही लिहिला होता. त्याचाही संदर्भ संपत यांनी दिला आहे.

संपत यांनी म्हटलं आहे, की `महात्मा गांधी यांचं हे पत्र आधीपासूनच अस्तित्वात आहे, तर राजनाथसिंह यांच्या विधानावरून वाद का निर्माण झाला?`

`गांधी आश्रमानं या पत्रात फेरबदल केला असं तुम्ही म्हणणार नाही, अशी आशा मी व्यक्त करतो,` असंही संपत यांनी ट्विटच्या माध्यमातून पुरावे सादर करताना लिहिलं आहे. 'तुम्हाला यापेक्षा जास्त स्पूनफीडिंग करू शकत नाही,' असंही त्यांनी म्हटलं आहे.

या मंदिरात स्वत: कलेक्टर देवीला दाखवतात मदिरेचा नैवेद्य,तीर्थ म्हणूनही होतं वाटप

या पुस्तक प्रकाशन समारंभात सरसंघचालक मोहन भागवतदेखील उपस्थित होते. ते म्हणाले, `सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम जोमात सुरू आहे. सावरकरांचं हिंदुत्व, विवेकानंदांचं हिंदुत्व असं बोलणं हे फॅशन झालं आहे. हिंदुत्व एकच आहे, सुरुवातीपासून ते एकच होतं आणि शेवटीही ते एकच असेल. परिस्थिती पाहून याचा प्रखर पुरस्कार करणं सावरकरांना आवश्यक वाटत होतं. सध्या संघ आणि सावरकरांवर जोरदार टीका होते. येत्या काळात स्वामी विवेकानंद, दयानंद आणि स्वामी अरविंद यांच्यावर टीका होईल. भारत जोडल्यानं ज्यांची दुकानं बंद होणार आहेत, त्यांना ते नकोय. अशा जोडणाऱ्या विचारांना धर्माचं नाव दिलं जातं. मात्र ही बाब धर्माशी किंवा पूजा-अर्चा याच्याशी निगडीत नाही. त्याला मानवतेची किंवा संपूर्ण जगाची एकता म्हणतात. सावरकरांनाही हेच अपेक्षित होतं.`

First published:

Tags: History, Mahatma gandhi, V.D. Savarkar