मराठी बातम्या /बातम्या /देश /

'...ते कधीही मुस्लिमांचे शत्रू नव्हते'; स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत मोहन भागवत यांची प्रतिक्रिया

'...ते कधीही मुस्लिमांचे शत्रू नव्हते'; स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत मोहन भागवत यांची प्रतिक्रिया

Veer Savarkar: The Man Who Could Have Prevented Partition या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात झालं.

Veer Savarkar: The Man Who Could Have Prevented Partition या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात झालं.

Veer Savarkar: The Man Who Could Have Prevented Partition या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात झालं.

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरील 'वीर सावरकर: द मॅन हू कुड हॅव प्रीव्हेंटेड पार्टिशन' (Veer Savarkar: The Man Who Could Have Prevented Partition) या पुस्तकाचं प्रकाशन (Publication) काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Sinh)यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात झालं.

यावेळी मोहन भागवत आपल्या भाषणात म्हणाले की, 'वीर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या (Hindutva) विचारसरणीने कधीही लोकांमध्ये त्यांची संस्कृती आणि देवाची उपासना करण्याची पद्धत यावरून भेद करण्याची शिकवण दिली नाही. सावरकर म्हणत असत, आपण असा भेद का करायचा? आपण सगळे एकाच मातृभूमीचे पुत्र आहोत. आपण भाऊ आहोत. उपासनेच्या वेगवेगळ्या पद्धती ही आपल्या देशाची परंपरा आहे. आपण आपल्या देशासाठी एकत्र लढलोही आहोत. मग भेदभाव का करायचा?'

सावरकरांनी उर्दूमध्ये (Urdu) अनेक गझल (Gazhal)लिहिल्या आहेत. ते कधीही मुस्लिमांचे शत्रू नव्हते किंवा मुस्लीमद्वेष्टेही नव्हते हे यावरून स्पष्ट होत असल्याचं भागवतांनी अधोरेखित केलं.

'हिंदुत्व आणि भारतीय समाजातील ऐक्याबद्दल भारतातील अनेकांनी मतं मांडली होती, पण फक्त एकट्या सावरकरांनी त्यासाठी आवाज उठवला आणि आता, इतक्या वर्षानंतर असं वाटतं, की त्याचवेळी प्रत्येकाने आवाज उठवला असता, तर देशाची फाळणी झाली नसती. फाळणीनंतर पाकिस्तानात (Pakistan) स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांना त्या देशात कोणतीही प्रतिष्ठा नाही, कारण ते मूळचे भारतीय आहेत आणि हे वास्तव कधीही बदलले जाऊ शकत नाही. आमचे पूर्वज एकच आहेत, फक्त आमची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे. आमच्या सनातन धर्माच्या उदार संस्कृतीचा सर्वांना अभिमान आहे. तो वारसा आपल्याला पुढे घेऊन जातो, म्हणूनच आपण सर्व इथे एकत्र राहत आहोत. सावरकरांचं हिंदुत्व असो किंवा विवेकानंदांचं हिंदुत्व, सर्व समान आहेत कारण ते सर्व एकाच सांस्कृतिक राष्ट्रवादाबद्दल (Cultural Nationalism) बोलतात जिथे लोकांमध्ये त्यांच्या विचारसरणीच्या आधारावर भेद केला जात नाही,' असंही भागवत यांनी यावेळी नमूद केलं.

यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister-Rajanth Sinh) यांनी वीर सावरकरांचा कट्टर राष्ट्रवादी आणि 20 व्या शतकातील भारताचा पहिला लष्करी रणनीतिकार (Defence Strategist) म्हणून गौरव केला.

महात्मा गांधींच्या सूचनेनुसार सावरकरांनी केलेली दया याचिका : राजनाथ सिंह

'सावरकर हे भारताचे राष्ट्रीय आदर्श होते, संरक्षण आणि मुत्सद्देगिरीचे सिद्धांत त्यांनीच देशाला दिले. ते भारतीय इतिहासाचे प्रतीक होते आणि कायम राहतील. त्यांच्याबद्दल मतभेद असू शकतात, परंतु त्यांची अवहेलना करणं चुकीचं आणि अन्यायकारक आहे. ते एक स्वातंत्र्यसैनिक आणि कट्टर देशभक्त होते. मात्र मार्क्सवादी (Marxist) आणि लेनिनवादी (Leninist) विचारसरणीचे लोक त्यांना फॅसिस्ट (Fascist)म्हणतात. सावरकरांचा केला जाणारा तिरस्कार अत्यंत अयोग्य आहे,' असंही सिंह यांनी सांगितलं.

'सावरकरांबद्दल सातत्याने खोटी माहिती पसरवली गेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांची वचनबद्धता इतकी अतूट होती की, ब्रिटिशांनी त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यावेळी त्यांनी तुरुंगातून सुटकेसाठी अनेक दया याचिका दाखल केल्या, असं सांगितलं जातं, पण महात्मा गांधींनीच त्यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते, हे सांगितलं जात नाही, याकडे सिंह यांनी लक्ष वेधलं.

'सावरकर हे स्पष्टपणे सांगत होते की, भारताचे इतर देशांशी असलेले संबंध भारताच्या सुरक्षा आणि हितसंबंधांसाठी किती अनुकूल आहेत यावर अवलंबून असले पाहिजे, मग त्या देशातील सरकार कोणतेही असो. सावरकर हे 20व्या शतकातील भारताचे पहिले लष्करी धोरणात्मक विषय तज्ज्ञ (First Military strategic affairs expert) होते, ज्यांनी देशाला मजबूत संरक्षण आणि मुत्सद्देगीरीचे सिद्धांत दिले,' असंही सिंह यांनी स्पष्ट केलं.

सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेवर बोलताना ते म्हणाले की, 'त्यांच्यासाठी 'हिंदू' हा शब्द कोणत्याही धर्माशी (Religion)संबंधित नाही आणि ती संकल्पना भारताच्या भौगोलिक आणि राजकीय अस्मितेशी जोडलेली होती. सावरकरांसाठी हिंदुत्व हे सांस्कृतिक राष्ट्रवादाशी (Cultural Nationalism) जोडलेलं होतं.'

'संस्कृती आणि धर्माच्या आधारावर जिथे नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव (Differentiated) केला जाणार नाही, असं राज्य त्यांच्यासाठी आदर्श राज्य होतं, म्हणूनच त्यांचे हिंदुत्व सखोलपणे समजून घेण्याची गरज आहे,' असं मत सिंह यांनी व्यक्त केलं.

First published:

Tags: RSS, Rss mohan bhagwat, Vinayak damodar savarkar