मराठी बातम्या /बातम्या /देश /Global Warming : 'तापमानवाढीमुळे आगामी काळ भारतासाठी खूप आव्हानात्मक'

Global Warming : 'तापमानवाढीमुळे आगामी काळ भारतासाठी खूप आव्हानात्मक'

 युरो मेडिटेरॅनियन सेंटर ऑन क्लायमेट चेंज (UMCC) या संशोधन संस्थेतल्या 40 हून अधिक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. जगातला कार्बन उत्सर्जनाचा (Carbon Emission) वेग असाच कायम राहिला, तर 2065 पर्यंत उष्णता 25 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.

युरो मेडिटेरॅनियन सेंटर ऑन क्लायमेट चेंज (UMCC) या संशोधन संस्थेतल्या 40 हून अधिक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. जगातला कार्बन उत्सर्जनाचा (Carbon Emission) वेग असाच कायम राहिला, तर 2065 पर्यंत उष्णता 25 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.

युरो मेडिटेरॅनियन सेंटर ऑन क्लायमेट चेंज (UMCC) या संशोधन संस्थेतल्या 40 हून अधिक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. जगातला कार्बन उत्सर्जनाचा (Carbon Emission) वेग असाच कायम राहिला, तर 2065 पर्यंत उष्णता 25 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : रोममध्ये शनिवारपासून (30 ऑक्टोबर) 16वी जी-20 परिषद (G20 Summit) होणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामानबदलाशी संबंधित असलेल्या एका अहवालाने जगभरातल्या देशांना विचार करण्यास प्रवृत्त केलं आहे. युरो मेडिटेरॅनियन सेंटर ऑन क्लायमेट चेंज (UMCC) या संशोधन संस्थेतल्या 40 हून अधिक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. जगातला कार्बन उत्सर्जनाचा (Carbon Emission) वेग असाच कायम राहिला, तर 2065 पर्यंत उष्णता 25 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. तापमान चार अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तापमानवाढीमुळे भारतात ऊस, गहू, मका आदी पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज असून, परिस्थिती अशीच राहिली, तर 2050पर्यंत शेतीसाठी पाण्याच्या मागणीत 29 टक्के वाढ होईल. या सगळ्याचा परिणाम साहजिकच उत्पादनावर दिसून येईल, असं त्या अहवालात म्हटलं आहे.

  अहवालात असंही म्हटलं आहे, की आगामी 30 वर्षांत तापमानवाढ (Global Warming) आणि गरम वाऱ्यांमुळे भयंकर दुष्काळाचं संकट ओढवू शकतं. त्यासोबतच शेतीसाठी आवश्यक पाण्याच्या तुटवड्याचा धोकाही जाणवत आहे. अशा प्रकारच्या हवामानबदलामुळे जंगलांमधल्या आगीच्या घटना वाढतील. तसेच मनुष्यहानी होण्याचाही धोका आहे. भारतात गहू आणि तांदूळ या प्रमुख अन्नधान्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जवळपास 81 अब्ज युरोचं नुकसान होऊ शकतं. 2050 पर्यंत 15 टक्के शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होईल. 2050पर्यंत कार्बन उत्सर्जनात घट झाली, तर मत्स्योत्पादनातली घट 8.8 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहील. कार्बन उत्सर्जन वाढलं, तर मत्स्योत्पादनातली घट 17.1 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. भारतात सध्या 13 लाख नागरिकांना पुराचा धोका आहे. 2050पर्यंत हा धोका असलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 80 लाखांपर्यंत जाण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

  ईशा अंबानींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! दी स्मिथसॉनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट्सच्या विश्वस्त मंडळात नियुक्ती

  अहवालात असं म्हटलं आहे की, जी-20 देशांना आधीपासूनच हवामानबदलाचे (Climate Change) दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. गेल्या 20 वर्षांत जी-20 देशांत उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणा 15 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या देशांमध्ये जंगलात लागलेल्या आगींमुळे एवढ्या मोठ्या क्षेत्राचं नुकसान झालं आहे, की ते क्षेत्र जवळपास कॅनडाच्या दीडपट एवढं असेल. कार्बन उत्सर्जनात वाढ झाली, तर भारतात स्थिती आणखीच बिकट होईल. स्टॅनफोर्डमधल्या टिग्चेलोर युनिव्हर्सिटीतल्या डॉ. मिशेल यांचं म्हणणं आहे, की हवामानबदलामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. त्यात आरोग्य, शेती, अन्नधान्य अशा सर्व बाबींचा समावेश आहे. त्यामुळे जी-20 देशांनी आताच या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे.

  'ते काम होत नसेल तर बदली करून घ्या'; शाहांनी काश्मीरमधील अधिकाऱ्यांना खडसावलं

  भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसीचे संशोधन संचालक आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस व आयपीसीसीचे लेखक डॉ. अनिल प्रकाश म्हणतात, की तापमानवाढीमुळे हिमालयातल्या हिमनद्या वितळत आहेत. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वेगाने बदल दिसून येत आहेत. उत्तराखंडात झालेल्या अतिवृष्टीसारख्या घटनांची वारंवारता वाढली आहे. तिथे 24 तासांतच 300 ते 400 मिलिमीटर पाऊस पडला होता. या पार्श्वभूमीवर भारताला हवामानबदलाच्या अनुषंगाने आपल्या पायाभूत सुविधांमध्ये लवचिकता आणायला हवी, जेणेकरून अशा परिस्थितीशी दोन हात करता येतील.

  First published:

  Tags: Climate change, India