मराठी बातम्या /बातम्या /देश /

जेव्हा पंतप्रधान मोदींचा मित्र त्यांना धोका देतो, बिहारच्या विधानसभेत NRC लागू न करण्याचा ठराव मंजूर

जेव्हा पंतप्रधान मोदींचा मित्र त्यांना धोका देतो, बिहारच्या विधानसभेत NRC लागू न करण्याचा ठराव मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर असताना मोदी यांच्या देशातल्या मित्राने मात्र मोदींना मोठा धक्का दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर असताना मोदी यांच्या देशातल्या मित्राने मात्र मोदींना मोठा धक्का दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर असताना मोदी यांच्या देशातल्या मित्राने मात्र मोदींना मोठा धक्का दिला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

पाटणा, 25 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर असताना मोदी यांच्या देशातल्या मित्राने मात्र मोदींना मोठा धक्का दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी NRC लागू न करण्याचा प्रस्ताव विधानसभेत पारित केला आहे. याशिवाय NPR च्या विवरणपत्रातील वादग्रस्त कलमं हटवण्याची मागणी केली आहे. याशिवाय एन.आर.सी. लागू करण्याची काहीही गरज नसल्याचंही नितीशकुमार यांनी म्हटलं आहे. नितीशकुमार यांची ही भूमिका पंतप्रधान मोदी यांच्यासाठी धक्का मानली जाते. नितीश कुमार आणि जनता दल युनायटेड (JDU) हा केंद्रातल्या आघाडीतला सहकारी पक्ष मानला जातो. एन.आर.सी लागू न करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाचं लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि विधानसभेतले विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांचं अभिनंदन केलं आहे. या संदर्भातला मुख्य प्रस्ताव विरोधकांनीच मांडला होता.

भाजपमुळे सभागृहात गोंधळ

सरकारने विरोधाचा प्रस्ताव आणल्यामुळे सभागृहात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. विरोधकांनी मात्र केंद्राचा हा कायदा ‘काळा कायदा’ असल्याची टीका करत सरकारच्या एन.आर.सी. लागू न करण्याच्या प्रस्तावाचं स्वागत केलं.

वाचा - मोदींनी 24 तासात बदललं ट्रम्प यांचं मन! पाक, काश्मीर आणि CAA वर काय म्हणाले?

सरकारने हा प्रस्ताव आणत असल्याची सभागृहात घोषणा करताच भाजप आणि जद च्या सदस्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध झालं. मला माझ्या आईचा जन्म कधी आणि कुठे झाला हे माहीत नसल्याचं मुख्यमंत्रि नितीश कुमार यांनी म्हटलं आणि सभागृहातल्या गोंदळात भर पडली.

जद आणि भाजपच्या दरस्यांनी मोदी विरोधाचा आणि समर्थनाच्या जोरदार घोषणा दिल्या. सरकारला आमच्या मागणीगुढे गुढगे टेकावे लागले असा दावा विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.

नितीशकुमारांना चिंता विधानसभेची

एन.आर.सी. आणि एन.पी.आर. च्या विरोधात सभागृहात प्रस्ताव आणण्यासाठी विरोधकांच्या रणनितीला नितीशकुमारच्या सरकारने कोणताही विरोध केला नाही. याचं कारण सुद्धा वेगळं आहे.

वाचा - महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक, ही नावं आहेत चर्चेत

याच वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये बिहार विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. राज्यातल्या मतांची आकडेवारी पाहता ओबीसी मतं (45 टक्के), महादलित (15 टक्के), मुस्लीम मतं जवळजवळ 17 टक्के आहेत. मागच्यावेळी भाजपचं समर्थन मिळाल्यामुलेत नितीशकुमार यांना सत्ता स्थापन करता आली होती. सध्याचं देशातलं भाजप, मोदी-शहा आणि एन.आर.सी. च्या विरोधातला अल्पसंख्याक समाजातला रोष पाहता नितीश कुमार यांना मतांची चिंता आहे.

" isDesktop="true" id="437742" >

First published:

Tags: Bihar (Indian State), Citizenship Amendment act, Narendra Modi (Politician), Nitish kumar