महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक, ही नावं आहेत चर्चेत

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक, ही नावं आहेत चर्चेत

महाराष्ट्रातलं राजकीय गणित बदलल्याने त्याचा फटका भाजपला बसणार असून महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : महाराष्ट्रातून  राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातलं राजकीय गणित बदलल्याने त्याचा फटका भाजपला बसणार असून महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. तर भाजपचे फक्त दोन सदस्य निवडून येऊ शकतात. महाराष्ट्रातील  7 जागांसाठी 26 मार्च 2020 ला निवडणूक होणार असून याच दिवशी  निकाल जाहीर होणार आहे. संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 (2,9 आणि12 एप्रिल) मध्ये  संपत आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर  निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी  निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

असा असणार निवडणूक कार्यक्रम

महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या राज्यसभेतील 55 जागांसाठी 26  मार्च 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 6 मार्चला निवडणूक अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 मार्च असून 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल.  18 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर  26 मार्च ला सकाळी 9 ते  दुपारी  4 वाजे दरम्यान मतदान घेण्यात येणार तर दुपारी 5 वाजता  मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.

सुप्रीम कोर्टात स्वाइन फ्लू; 6 न्यायाधीशांना लागण, सर्वांचं होणार लसीकरण

भाजपतर्फे उदयनराजे भोसले आणि रिपब्लिकन पक्षाते नेते रामदास आठवले यांची नावं जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हेही पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी उदयनराजें भोसले यांच्यावर टीका करत भाजपच्या उमेदवारीवर दावा ठोकलाय. मात्र गेल्या काही वर्षात त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं करत भाजपला अडचणीत आणलं होतं. त्यामुळे त्यांना तिकिट मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांनीच जास्तीच जोर लावल्यास भाजप त्यांना उ

जगाला धडकी भरविणारी ही हेलिकॉप्टर्स भारत घेणार, 21 हजार कोटींचा करार

माणुसकीला काळीमा! हायवेवर 12 तास तरुणाच्या अंगावरून गेल्या हजारो गाड्या

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 04:45 PM IST

ताज्या बातम्या