Home /News /national /

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान सुरक्षा दलाकडून गोळीबार, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान सुरक्षा दलाकडून गोळीबार, चौघांचा मृत्यू

मतदानादरम्यान सीएपीएफ म्हणजेच केंद्रीय सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या कथित गोळीबारादरम्यान चौघांचा मृत्यू (Four Killed in Firing By Security Forces) झाला आहे.

    कोलकाता 10 एप्रिल : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Election 2021) आज चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदानादरम्यान सीएपीएफ म्हणजेच केंद्रीय सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या कथित गोळीबारादरम्यान चौघांचा मृत्यू (Four Killed in Firing By Security Forces) झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कूचबिहार जिल्ह्यातील सिताकुल्ची विधानसभेंतर्गत येणाऱ्या माथाभंगा येथील जोरपट्टी परिसरातील आहे. याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार पोलीस सूत्रांनी सांगितलं, की CISF वर हल्ला झाल्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून दलानं हा गोळीबार केला. यात चौघांचा मृत्यू झाला. ही बातमी देईपर्यंत मृतांची नावं उघड झाली नव्हती. याआधीदेखील कूचबिहार जिल्ह्यातच एका मतदान केंद्राच्या बाहेर अज्ञातांनी शनिवारी पहिल्यांदा मतदान करण्यासाठी आलेल्या युवकाची गोळी मारुन हत्या केली होती. पोलिसांनी ही माहिती दिली. तृणमूल काँग्रेसनं असा आरोप केला आहे, की यात भाजपचा हात आहे. मात्र, भाजपनं म्हटलं, की संबंधित. युवक हा मतदान केंद्रावर पोलिंग एजंट होता आणि या घटनेसाठी भाजपनं राज्य सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की आनंद बर्मन नावाच्या युवकाला सिताल्कुचीच्या पठानतुली परिसराच बूथ नंबर 85 च्या बाहेर ओढत आणण्यात आलं आणि गोळी मारुन त्याची हत्या केली. घटनेच्या वेळी मतदान सुरू होतं. त्यांनी सांगितलं, की या घटनेनंतर भाजप आणि तृणमूलच्या समर्थकांमध्ये झडप झाली. यात बॉम्बही फेकण्यात आल्यानं अनेक लोक जखमी झाले. केंद्रीय दलांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. TMC नं मान्य केला बंगालमधील पराभव? प्रशांत किशोर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल एका निवडणूक अधिकाऱ्यानं सांगितलं, की आम्हाला सूचना मिळाली आहे, की कूचबिहार जिल्ह्यातील सिताल्कुचीमध्ये एका मतदान केंद्राबाहेर एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आम्ही पर्यवेक्षकांना लवकरात लवकर रिपोर्ट देण्याची मागणी केली आहे. सिताल्कुची भागातच काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावरही हल्ला झाला होता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Gun firing, Violence, Voting, West Bengal Election

    पुढील बातम्या