पीलीभीत, 19 नोव्हेंबर: एकाच कुटुंबातील चार सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर नराधमांनी मोबाईलमध्ये पीडित मुलीचा अश्लिल व्हिडीओ देखील शूट केला. ही घटना उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील एका गावात घडली आहे.
17 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे चारही आरोपी सख्खे भाऊ आहेत. सर्व 23 ते 28 वयोगटातील आहेत.
हेही वाचा..'देशातील सर्व नागरिकांना Covid -19ची लस मोफत द्या'; नारायण मूर्तींनी सूचवला उपाय
अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना 9 ऑक्टोबर घडली. सर्व आरोपी अचानक पीडितेच्या घरात घुसले होते. नंतर त्यांनी पीडितेवर सामुहिक बलात्काराचाही प्रयत्न केला. पीडितेचा छेड काढताना एकानं मोबाइल फोनमध्ये व्हिडिओ बनवला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मात्र, तितक्यात पीडितेनं आरडाओरड केल्यानंतर आजुबाजूचे लोक गोळा झाले. घराबाहेर लोकांची गर्दी पाहिल्यानंतर आरोपी फरार झाले होते.
पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली. तसेच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलिस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला आहे.
पीडित कुटुंबाला आरोपींकडून मारहाण...
पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, आरोपीकडून त्यांच्या कुटुंबाला धोका आहे. एक आरोपी अजूनही पीडितेकडे पाहून अश्लिल हावभाव करतो. याबाबत त्याला जाब विचारला असता आरोपी दानिश आणि त्याच्या इतर तीन भावांनी पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. पोलिसांकडे तक्रार दिली तर मुलीचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर करू, अशी धमकी देखील दिली.
हेही वाचा..मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिजला 10 वर्षांची शिक्षा
पोलीस निरीक्षक श्रीकांत द्विवेदी यांनी सांगितलं की, मुख्य आरोपी दानिश यांच्यासह त्याच्या तिन्ही भावांविरुद्ध भादंवि कलम 354, 323, 452, आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पॉक्सो कायद्यातंर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.