मराठी बातम्या /बातम्या /देश /

'देशातील सर्व नागरिकांना Covid -19 ची लस मोफत द्या'; नारायण मूर्तींनी सुचवला उपाय

'देशातील सर्व नागरिकांना Covid -19 ची लस मोफत द्या'; नारायण मूर्तींनी सुचवला उपाय

आता अनेक राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारांची चिंता वाढली आहे.

आता अनेक राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारांची चिंता वाढली आहे.

आता अनेक राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारांची चिंता वाढली आहे.

    नवी दिल्‍ली, 19 नोव्हेंबर : सध्या संपूर्ण जग कोरोना लशीच्या (Covid-19 Vaccine) प्रतीक्षेत आहे. केवळ सर्वसामान्यचं नाही तर मोठ मोठे लोकही या लशीच्या प्रतीक्षेत आहे. मॉडर्ना आणि फायजरसारख्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्यांना अपेक्षा आहे की, कोरोना व्हायरस  (Coronavirus) च्या ज्या लशीवर काम करीत आहेत, त्याचे परिणाम चांगलेच येतील. मात्र त्याच्या किमतीबाबत सर्वसामान्यांमध्ये चिंता आहे. ही लस सर्वसामान्यांना मिळू शकेल की नाही...या लशीच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील की नाही याबाबत लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कोरोना लस मोफत मिळणार? दरम्यान इन्फोसिसचे सहसंस्थापक एन.आर. नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) म्हणाले की, एकदा कोरोना लस बाजारात उपलब्ध झाल्यास प्रत्येक व्यक्तीला ही लस मोफत उपलब्ध करुन द्यावयास हवी. कोणाकडूनही त्यासाठी पैसे घेतले जाऊ नये. ते पुढे म्हणाले की, कॉर्पोरेट जगतात टॅक्स लावला तरी चालेल, मात्र सर्वसामान्यांना कोरोना लस मोफत उपलब्ध व्हायला हवी. कोरोना संकटाच्यादरम्यान नारायण मूर्ती यांचं हे वक्तव्य खूप महत्त्वाचं आहे. हे ही वाचा-चुकीच्या इंजेक्शनमुळे जन्माला आली मुलगी; दाम्पत्याला मिळाले तब्बल 74 कोटी रुपये बिहारच्या निवडणुकीत भाजपच्या घोषणापत्रात मोफत कोरोना लशीचा समावेश काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या बिहार निवडणुकीच्या (Bihar Election) दरम्यान भाजपने (BJP) आपले घोषणा पत्र जारी केलं होतं. ज्यामध्ये अर्थ मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी सर्व कोरोना - 19 लशी मोफत उपलब्ध करुन देण्याचं वचन दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, ज्या कंपन्या औषधांच्या निर्मितीचा खर्च उचलू शकतात, त्यांना मोफत लस तयार करून सर्वांना द्यायला हवी आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण करायला हवी. यानंतर नारायण मूर्ती यांचं वक्तव्य या वेळेत आले आहे, जेव्हा मॉडर्ना आणि फाइजर कंपन्या दोन डोसची औषधं बाजारात दाखल करणार आहेत. आकड्यांचा अंदाज घेतला तर संपूर्ण देशातील नागरिकांना लस मिळवून देण्यासाठी सरकारला तब्बल 3 अरब डोसची आवश्यकता आहे. मंगळवारी कोरोनाची रुग्णसंख्या 38000 हून अधिक गेली आहे. जी एक दिवसांपूर्वी 30 हजारांहून कमी होती. मात्र आता अनेक राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारांची चिंता वाढली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या