होशियारपूर, 3 मे : चार मुलांनी एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर मागील एका वर्षात अनेक वेळा बलात्कार (Rape On Minor) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना पंजाब राज्यातील होशियारपूर (Rape In Hoshiyarpur) येथील एका गावात घडली. या घटनेची माहिती सोमवारी पोलिसांनी दिली.
काय आहे नेमके प्रकरण -
पोलिसांनी सांगितले आहे की, या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांचे वय जवळपास 10 ते 11 वर्ष आहे. पीडित मुलीने आपल्या परिवाराला सांगितल्यानंतर नुकतीच याबद्दल तक्रार दाखल केल्याची पोलिसांनी सांगितले. यानंतर चारही आरोपींविरोधात रविवार संध्याकाळी पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मित्रांसह पोटच्याच 9 वर्षीय लेकीवर केला बलात्कार -
माणुसकीला काळीमा फासणारी आणि नात्याला कलंक लावणारी घटना छत्तीसगडमधील जशपूरमध्ये (Jashpur Rape Case) समोर आली आहे. नऊ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape In Jashpur) झाला आहे. या संतापजनक घटनेतील मुख्य आरोपी या मुलीचा बापच आहे. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडितेने तिच्या आजीला माहिती दिली. यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी सामूहिक बलात्कारातील तिघांना अटक केली आहे. पीडिताच्या आजीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी बाप आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात 376 (घ) 376 (क,ख) पॉस्को कायदा 4,6,17 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gang Rape, Police, Punjab, Rape on minor