जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / क्रुरतेचा कळस! गर्भवती महिलेच्या पतीला मारहाण केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार; अल्ववयीन तरुणासह तिघांना अटक

क्रुरतेचा कळस! गर्भवती महिलेच्या पतीला मारहाण केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार; अल्ववयीन तरुणासह तिघांना अटक

क्रुरतेचा कळस! गर्भवती महिलेच्या पतीला मारहाण केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार; अल्ववयीन तरुणासह तिघांना अटक

सामूहिक बलात्काराची एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी रेल्वे स्थानकातून गर्भवती महिलेचे अपहरण करण्यात आले. एवढेच करुन हे नराधम थांबले नाहीत, त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अमरावती, 3 मे : आंध्रप्रदेश राज्यातून सामूहिक बलात्काराची (gang rape in andhra pradesh) एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी रेल्वे स्थानकातून गर्भवती महिलेचे अपहरण करण्यात आले आणि एवढेच करुन हे नराधम थांबले नाहीत, त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर (gang rape on pregnant woman) आली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाशम जिल्ह्यातील यररागोंडा येथील एक महिला आपल्या पती आणि मुलांसोबत रेल्वे स्थानकावर रेल्वेतून उतरले होते. मात्र, रात्र झाल्याने यांनंतर त्यांना पुढे जाण्यासाठी कोणतीही बस मिळाली नाही. यामुळे ते रेल्वे स्थानकावरच झोपले. याचवेळी तीन आरोपी तिथे पोहोचले. त्यांनी या गर्भवती महिलेच्या पतीला मारहाण केली. तसेच गर्भवती महिलेला त्याठिकाणी असणाऱ्या झाडांच्या मागे घेऊन गेले. या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेच्या पतीने यावेळी आरडाओरड करुन रेल्वे पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. हे कुटुंब कामाच्या शोधात गुंटूर येथून कृष्णा जिल्ह्याकडे जात होते. बापटला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वकुल जिंदल यांनी सांगितले की, तीन आरोपींनी नशेत या महिलेच्या पतीला मारहाण केली आणि महिलेसोबत दुष्कर्म केले. घटनेनंतर महिला जवळच्या झाडांमध्ये आढळली. त्यानंतर तिला वैद्यकीय तपास आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर तिला ओंगोल येथील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (RIMS) येथे शिफ्ट करण्यात आले आहे. ही घटना शनिवार आणि रविवार रात्रीच्या दरम्यानची आहे. हे वाचा -  500 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीची देहविक्री, अनेकांनी केले अत्याचार, लातूरमधील संतापजनक घटना कठोर कारवाईचे आदेश - याप्रकरणी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि आंध्रप्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा वसीरेड्डी पद्मा यांनी रविवारी या घटनेप्रकरणी चौकशी आणि आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात