मराठी बातम्या /बातम्या /देश /माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राज्यसभेत शेवटच्या रांगेत बसणार, वाचा काय आहे कारण..

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राज्यसभेत शेवटच्या रांगेत बसणार, वाचा काय आहे कारण..

 देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग हे अत्यंत अनुभवी संसदपटू आहेत. ते आता राज्यसभेत शेवटच्या रांगेत बसणार आहेत.

देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग हे अत्यंत अनुभवी संसदपटू आहेत. ते आता राज्यसभेत शेवटच्या रांगेत बसणार आहेत.

देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग हे अत्यंत अनुभवी संसदपटू आहेत. ते आता राज्यसभेत शेवटच्या रांगेत बसणार आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 3 फेब्रुवारी :  देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग हे अत्यंत अनुभवी संसदपटू आहेत. राज्यसभेमध्ये त्यांची बसण्याची जागा पहिल्या रांगेमध्ये असते; मात्र बसण्याच्या जागांमध्ये करण्यात आलेल्या बदलांनंतर आता डॉ. मनमोहनसिंग यांना शेवटच्या रांगेतली जागा देण्यात आली आहे. त्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही. डॉ. सिंग यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. 90 वर्षांचे डॉ. मनमोहनसिंग सध्या व्हीलचेअरवर आहेत. व्हीलचेअरवरून त्यांना सभागृहात येण्यासाठी जास्त कष्ट पडू नयेत, यासाठी त्यांची जागा बदलल्याचं काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी गुरुवारी (2 फेब्रुवारी) सांगितलं. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    काँग्रेसने या अधिवेशनात आपल्या खासदारांच्या बसण्याच्या जागेत काही बदल केले आहेत. पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं की, माजी पंतप्रधान डॉ. सिंग आता व्हीलचेअरवर आहेत. त्यामुळे त्यांना येणं-जाणं सोयीचं व्हावं, यासाठी त्यांना शेवटच्या रांगेतली जागा देण्यात आली आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सभागृहाचे उपसभापती हरिवंश यांच्या शेजारी पहिल्या रांगेत आपल्या नेहमीच्या जागेवर बसतील. याशिवाय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह आता पहिल्या रांगेतल्या जागांवर बसतील.

    IAS अधिकाऱ्याकडून सहकाऱ्यांना आई-बहिणीवरून शिव्या, भाजपची कारवाईची मागणी

    डॉ. मनमोहनसिंग यांचा लंडनमध्ये गौरव

    डॉ. मनमोहनसिंग यांना आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातल्या योगदानाबद्दल लंडनच्या 'इंडिया-यूके अचिव्हर्स ऑनर्स'तर्फे नुकताच 'जीवनगौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अ‍ॅल्युमनी युनियन युनायटेड किंग्डम (NISAU-UK) डॉ. सिंग यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करणार आहे.

    डॉ. मनमोहनसिंग यांची प्रकृती फारशी ठीक नसते. काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील एम्समध्ये त्यांना अत्यावस्थ स्थितीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

    IIIT मधून शिक्षण, पहिल्याच प्रयत्नात IPS पण ध्येय होतं IAS, अखेर पूर्ण केलंच!

    विरोधी पक्षातील पुढच्या रांगेतील इतर नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (जेडीएस), संजय सिंग (आप), प्रेमचंद गुप्ता (आरजेडी), डेरेक ओब्रायन (तृणमूल काँग्रेस), के केशव राव (बीआरएस) आणि तिरुची शिवा (द्रमुक) यांचा समावेश आहे.

    भारतीय जनता पार्टीनंही आपल्या शेवटच्या रांगेतील आसन व्यवस्थेत काही बदल केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पहिल्या रांगेत बसणाऱ्यांच्या जागेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

    First published:

    Tags: Manmohan singh, Rajyasabha