पाटणा, 3 फेब्रुवारी : उत्तम प्रशासन व राज्यकारभार चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या उच्चशिक्षित अधिकाऱ्यांनी गुंडगिरी करायला सुरुवात केली, तर सामान्यांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न पडतो. बिहारमधल्या आयएएस पदावरच्या एका अधिकाऱ्याने सहकर्मचाऱ्यांना घाणेरड्या शिव्या दिल्या. त्याबद्दलचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झालाय. त्यावर बिहारच्या भाजप प्रवक्त्यांनी कडक कारवाईची मागणी केलीय. त्या अधिकाऱ्याला काढून टाकावं, असंही त्यांनी म्हटलंय.
बिहारमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याचा शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सध्या वातावरण तापलं आहे. त्या व्हिडिओत आयएएस अधिकारी के. के. पाठक यांनी बिहारच्या नागरिकांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले. सहकर्मचाऱ्यांना आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. BASA (Bihar Administrative Service Association) या संघटनेच्या प्रतिनिधींनाही तो बडबडला. पाठक हे Bipardचे (Bihar Institute of Public Administration & Rural Development) महासंचालक आहेत. बिहारच्या एक्साइज अँड प्रोहिबिशन विभागाचे ते अतिरिक्त मुख्य सचिवही आहेत. त्यांच्याबाबत आजवर अनेक तक्रारी येऊनही राज्य सरकारनं अद्याप त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. आता मात्र भाजपकडून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होतेय. पाठक यांनी माफी मागावी किंवा सरकारनं त्यांना बडतर्फ करावं असं भाजपचे बिहारमधले प्रवक्ते निखिल आनंद यांनी म्हटलंय. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केलाय. 'पाठक उच्चशिक्षित असतील; पण नोकरीमध्ये बराच काळ घालवल्यानंतर पाठक यांना मानसिक निराशा आली असावी,' असं त्या व्हिडिओबाबत त्यांनी लिहिलंय. रस्त्यावरच्या गुंडाप्रमाणे ते आई-बहिणीवरून शिव्या देत आहेत. आता त्यांनी माफी मागावी किंवा त्यांना काढून टाकावं असंही त्यांनी लिहिलंय.
IAS KK Pathak may be a very educated scholar but he has suffered from mental depression and frustration while being in bureaucracy for a long time. Get it treated. He is abusing mother- sister to the BASA officers like a street lumpen or hooligans. He must apologise or sack him. pic.twitter.com/TgeC39uH6e
— Nikhil Anand (@NikhilAnandBJP) February 2, 2023
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही भाजपनं टीका केलीय. मुख्यमंत्र्यांचं प्रशासनावर नियंत्रण नसल्याचं त्यांनी म्हटलंय. “पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं अजिबात नियंत्रण नाही. या सरकारमधली अराजकता आणि बेलगाम नोकरशाही नागरिकांशी स्वैरपणे वागते आहे,” असं भाजपनं म्हटलंय.
प्रशासकीय सेवेत आयएएस अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदं सांभाळायची असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाची मोठी जबाबदारीही असते; मात्र काही व्यक्तींच्या चुकीच्या वागण्यामुळे कामावर त्याचा परिणाम होतो. नागरिकांनाही त्याचा भुर्दंड सोसावा लागू शकतो. बिहारमधलं हे उदाहरण अशाच प्रकारच्या गैरवर्तणुकीचं आहे. त्यामुळे चांगलं काम करणाऱ्या सहकाऱ्यांनाही त्याचा त्रास होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.