जाहिरात
मराठी बातम्या / देश / भयंकर! दिल्लीच्या वृद्धाश्रमात जिवंत जळाली माजी पंतप्रधानांची सून; पोलिसांना दिसला हाडांचा सापळा

भयंकर! दिल्लीच्या वृद्धाश्रमात जिवंत जळाली माजी पंतप्रधानांची सून; पोलिसांना दिसला हाडांचा सापळा

देश

देश

नवीन वर्ष सुरु होताच 1 जानेवारीला राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. राजधानी दिल्लीतील ग्रेटर कैलास भागातील वृद्धाश्रमात आग लागली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 जानेवारी : नवीन वर्ष सुरु होताच 1 जानेवारीला राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. राजधानी दिल्लीतील ग्रेटर कैलास भागातील वृद्धाश्रमात आग लागली होती. या आगीमध्ये अनेकांचा जीव गेला होता. या आगीत माजी पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांची सून बेडवर जीवंत जाळली गेली होती. या बातमीमुळे सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलास भागातील वृद्धाश्रमात लागलेल्या आगीत 91 वर्षीय कमल कुमाार यांना बिछान्यातून उठता येत नव्हते. आग आटोक्या आणल्यानंतर पोलिस आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचली. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना कमल कुमार यांचा फक्त सांगाडाच सापडला. त्यांच्या नातवाने हाताल्या अंगठीवरुन त्यांची ओळख पटवली. रविवारी पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी त्यांचा मृतहेद नातवाच्या ताब्यात दिला. सध्या त्यांच्या कुटुंबात नातूच उपस्थित असल्याचं पोलिसांनी सांगितलं. माजी पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांचा मुलगी सुरेश राम यांच्या त्या पत्नी होता. हेही वाचा -  Video : दिल्ली अपघाताचा सर्वात मोठा ट्विस्ट; त्यावेळी एकटी नव्हती अंजली, धडक देताच पळाली मैत्रीण वृद्धांच्या संगोपनासाठी बांधलेले हे वृद्धाश्रम शुश्रूषागृहासारखे काम करत असल्याचे पोलिस उपायुक्तांनी सांगितले. आग विझवल्यानंतर, दिल्ली अग्निशमन विभाग, सीएटीएस रुग्णवाहिका टीमसह पोलीस पथक इमारतीत तपासणीसाठी पोहोचले तेव्हा त्यांना तिसऱ्या मजल्यावर दोन पूर्णपणे जळालेले मृतदेह आढळले. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरच आग लागली. 86 वर्षीय कांचन अरोरा आणि 92 वर्षीय कमल अशी मृतांची नावे आहेत. अवतार कौर (86), सरीफा (59), एलिझाबेथ (69) आणि नयन साहा (89) यांना इतर दोन महिलांसह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाने (DCW) रविवारी राष्ट्रीय राजधानीच्या ग्रेटर कैलास-2 भागात लागलेल्या आगीच्या घटनेत दोन वृद्ध महिलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांना नोटीस बजावली. मीडिया रिपोर्ट्सची स्वतःहून दखल घेत दिल्ली महिला आयोगाने 6 जानेवारीपर्यंत आगीच्या घटनेचा तपशीलवार अहवाल मागवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात