शुभम जायसवाल, प्रतिनिधी राजगढ, 10 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की तरुणाने दुचाकीवरून उडी मारून खांबाला जबर धडक दिली. यानंतर जखमी तरुणाला प्राथमिक उपचारासाठी जिरापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना भोपाळला रेफर केले आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. बब्लू मांगीलाल बागरी (25), असे या तरुणाचे नाव आहे. दिग्विजय सिंह हेही जखमी तरुणाची प्रकृती जाणून घेण्यासाठी जिरापूर रुग्णालयात पोहोचले होते. तेथून तरुणाला पुढील उपचारासाठी भोपाळला रेफर करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पुरोहित यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह गुरुवारी शोक व्यक्त करण्यासाठी जिल्हाध्यक्ष पुरोहित यांच्या कोडक्या गावात पोहोचले होते. तेथून मृत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करून ते पुन्हा राजगडच्या दिशेने येत असताना बबलू मांगीलाल बागरी (25) हा दुचाकीस्वार जिरापूर येथील शिक्षक कॉलनीजवळील रस्त्यावरून जात होता. यावेळी दिग्विजय सिंह यांच्या कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात बबलू दुचाकीवरून खाली पडून जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
माजी आमदार पुरुषोत्तम डांगी यांनी पोहोचवले रुग्णालयात - ब्यावरा येथील माजी आमदार पुरुषोत्तम डांगी यांची गाडी घटनास्थळी पोहोचताच डांगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी तरुणाला उचलून त्यांच्याच गाडीत बसवून जिरापूरच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर दिग्विजय सिंह देखील रुग्णालयात पोहोचले. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडून जखमी तरुणाची प्रकृती जाणून घेतली आणि त्याला चांगले उपचार देण्यास सांगितले. मोठी बातमी! शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांच्या टेम्पोचा भीषण अपघात; 35 जखमी तसेच दिग्विजय सिंह यांनी तरुणाच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे भोपाळला रेफर करण्याची मागणी केली, जेणेकरून सीटी स्कॅन करून त्याला चांगले उपचार मिळू शकतील. यानंतर त्या तरुणाला भोपाळला रेफर करण्यात आले आहे. दिग्विजय सिंह यांनी स्वत: त्याला भोपाळमध्ये दाखल करण्यासाठी खासगी रुग्णालयात व्यवस्था केली आहे. पोलिसांकडून कार जप्त - अपघातानंतर पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून झिरापूर पोलिसांनी चालकावर निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची कार जप्त करत पोलिस ठाण्यात आणली. तर राजगड जिल्ह्याचे कार्यक्रम आटोपून दिग्विजय सिंह दुसऱ्या गाडीतून भोपाळला रवाना झाले.