Home /News /national /

रुग्णालयातील चालती लिफ्ट 10 फूट खाली कोसळली; माजी मुख्यमंत्री थोडक्यात बचावले

रुग्णालयातील चालती लिफ्ट 10 फूट खाली कोसळली; माजी मुख्यमंत्री थोडक्यात बचावले

ज्यावेळी लिफ्ट अचानक खाली कोसळली त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ लिफ्टमध्ये उपस्थित होते. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याप्रकरणी चौकशीची आदेश दिले आहेत.

  इंदौर, 21 फेब्रुवारी : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ रविवारी एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. इंदौरच्या डीएनएस रुग्णालयात पोहचलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची लिफ्ट झटका देत अचानक जमिनीवर कोसळली. ज्यावेळी लिफ्ट अचानक खाली कोसळली त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ लिफ्टमध्ये उपस्थित होते. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याप्रकरणी चौकशीची आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे माजी मंत्री रामेश्वर पटेल यांची तब्येत खराब आहे. ते इंदौरच्या डीएनएस रुग्णालयात भरती आहेत. रविवारी रामेश्वर पटेल यांची विचारपूस करण्यासाठी कमलनाथ काही आमदार आणि पक्षातील नेत्यांसह DNS रुग्णालयात पोहचले होते. कमलनाथ लिफ्टमध्ये असतानाच लिफ्ट अचानक खाली आदळली. ओव्हरलोडिंगमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

  (वाचा - महाराष्ट्रामुळे देशात पुन्हा वाढला कोरोना; मोदी सरकारनं ठाकरे सरकारला खडसावलं)

  या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाहीय. लिफ्टमधील सर्वजण थोडक्यात बचावले आहेत. घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करुन, त्यांची विचारपूस करत माहिती घेतली. तसंच शिवराज सिंह चौहान यांनी इंदौरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Kamal nath, Madhya pradesh

  पुढील बातम्या